वर्ल्ड कप सेमी फायनलआधी ऑस्ट्रेलियाला धडकी भरली, टीम इंडियात लेडी सेहवागची एन्ट्री

Last Updated:

भारतीय महिला क्रिकेट टीमची ओपनर प्रतिका रावल पायाच्या दुखापतीमुळे वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे. प्रतिका रावलऐवजी शफाली वर्माची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली आहे.

वर्ल्ड कप सेमी फायनलआधी ऑस्ट्रेलियाला धडकी भरली, टीम इंडियात लेडी सेहवागची एन्ट्री
वर्ल्ड कप सेमी फायनलआधी ऑस्ट्रेलियाला धडकी भरली, टीम इंडियात लेडी सेहवागची एन्ट्री
मुंबई : भारतीय महिला क्रिकेट टीमची ओपनर प्रतिका रावल पायाच्या दुखापतीमुळे वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर झाली आहे. प्रतिका रावलऐवजी शफाली वर्माची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली आहे. हरियाणाची असलेली 21 वर्षांची शफाली वर्मा हिला भारतीय क्रिकेटमध्ये लेडी सेहवाग म्हणूनही ओळखलं जातं, कारण ओपनिंगला बॅटिंग करणारी शफाली पहिल्या बॉलपासूनच बॉलरवर आक्रमण करते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमी फायनलआधी शफाली वर्माला भारताच्या 15 सदस्यीय टीममध्ये स्थान देण्यात आलं आहे. आयसीसी आणि बीसीसीआयने शफालीच्या निवडीबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

प्रतिका वर्ल्ड कपमधून बाहेर

टीम इंडियाची ओपनर प्रतिका रावल मागच्या सामन्यात 21 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर फोर रोखण्याचा प्रयत्न करताना दुखापतग्रस्त झाली, यानंतर तिला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. पावसामुळे सामना रद्द होण्याआधीही प्रतिका बॅटिंगला आली नाही. तिच्याऐवजी अमनजोत कौरने ओपनिंगला आली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 30 ऑक्टोबरला वर्ल्ड कपची सेमी फायनल होणार आहे, त्याआधी शफाली वर्माची टीम इंडियात एन्ट्री झाली आहे. शफाली मागच्या वर्षी 50 ओव्हरचा फॉरमॅट खेळली होती. या वर्षाच्या सुरूवातीला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सीरिजमधून शफालीने जोरदार पुनरागमन केलं होतं. सर्वाधिक रन करणाऱ्या बॅटरमध्ये शफाली दुसऱ्या क्रमांकावर होती.
advertisement

शेफालीची वनडे कारकिर्द

यानंतर वर्मा 50 ओव्हर फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारत अ टीमचाही भाग होती, जिथे तिने अर्धशतक झळकावले. शफालीने भारताकडून 29 सामन्यांमध्ये 23 च्या सरासरीने आणि 83.2 च्या स्ट्राईक रेटने 644 रन केल्या आहेत, यात 4 शतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटमध्ये शफालीने 82 फोर आणि 7 सिक्स मारले आहेत.
advertisement

प्रतिका रावलची बॅट तळपली

प्रतिका रावल या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करणारी दुसरी बॅटर आहे. प्रतिकाने 6 इनिंगमध्ये 51.33 च्या सरासरीने 308 रन केल्या आहेत. प्रतिकापेक्षा जास्त रन तिची ओपनिंग सहकारी स्मृती मंधानाने केल्या आहेत. मंधाना 365 रनसह या यादीत अव्वल आहे. 25 वर्षांच्या प्रतिका रावलने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शानदार शतक झळकावलं आणि टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये पोहोचवलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वर्ल्ड कप सेमी फायनलआधी ऑस्ट्रेलियाला धडकी भरली, टीम इंडियात लेडी सेहवागची एन्ट्री
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement