दिवाळी पार्टीमध्ये दिसली पतीची EX पत्नी, संतापलेल्या रवीना टंडनने तिच्यावर फेकला ज्यूसचा ग्लास, नेमकं घडलं तरी काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Bollywood controversy : हा वाद तिचे पती अनिल थडानी यांची पहिली पत्नी नताशा सिप्पी हिच्यासोबत एका पार्टीत झाला होता, जिथे रवीनाने नताशावर थेट ज्यूस फेकला होता.
मुंबई: ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री रवीना टंडन तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. चित्रपटांव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातील एका जुन्या हाय-व्होल्टेज वादाने ती आजही चर्चेत असते. हा वाद तिचे पती अनिल थडानी यांची पहिली पत्नी नताशा सिप्पी हिच्यासोबत एका पार्टीत झाला होता, जिथे रवीनाने नताशावर थेट ज्यूस फेकला होता.
advertisement
advertisement
सूत्रांनुसार, नताशा सतत अनिल थडानी यांच्याजवळ येऊन त्यांच्याशी बोलण्याचा आणि जाणीवपूर्वक संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. रवीनाला नताशाचे हे वागणे अजिबात आवडले नाही आणि तिला खूप राग आला. एका मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने स्पष्ट केले होते की, नताशाने वारंवार अनिलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यामुळे ती नाराज होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


