Shev Bhaji Recipe: ढाब्यासारखी झणझणीत शेवभाजी आता घरच्या घरी बनवा, जाणून घ्या सरळ सोपी रेसिपी...

Last Updated:

Shev Bhaji Recipe In Marathi: आजकालच्या फास्ट फूडच्या काळात देखील ग्रामीण आणि रोडसाईड धाब्यांची चव लोक विसरू शकत नाहीत. त्यातीलच एक अविस्मरणीय चव म्हणजे धाबा स्टाइल शेवभाजी. झणझणीत मसाल्यांचा तडका, टोमॅटोच्या आंबटपणाची संगत आणि शेवची खमंग कुरकुरी या तिन्हींचा परिपूर्ण संगम म्हणजे ही भाजी. आज आपण पाहू या घरच्या घरी तीच धाब्याची चव कशी आणता येईल.

+
धाब्यावरील

धाब्यावरील चव आता घरच्या ताटात – झणझणीत शेवभाजीची सरळ सोपी रेसिपी.

आजकालच्या फास्ट फूडच्या काळात देखील ग्रामीण आणि रोडसाईड धाब्यांची चव लोक विसरू शकत नाहीत. त्यातीलच एक अविस्मरणीय चव म्हणजे धाबा स्टाइल शेवभाजी. झणझणीत मसाल्यांचा तडका, टोमॅटोच्या आंबटपणाची संगत आणि शेवची खमंग कुरकुरी या तिन्हींचा परिपूर्ण संगम म्हणजे ही भाजी. आज आपण पाहू या घरच्या घरी तीच धाब्याची चव कशी आणता येईल.
साहित्य (४ जणांसाठी):
  • तेल – २ टेबलस्पून
  • advertisement
  • कांदा – १ मोठा, बारीक चिरलेला
  • टोमॅटो – २ मध्यम, बारीक चिरलेले
  • advertisement
  • आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
  • लाल तिखट – २ टीस्पून
  • advertisement
  • धने-जिरे पूड – १ टीस्पून
  • हळद – ¼ टीस्पून
  • advertisement
  • गरम मसाला – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • advertisement
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
  • शेव (तीक्ष्ण किंवा मोटी) – १ कप
  • advertisement
    कृती:
    1. कढईत तेल तापवून त्यात जिरे टाका. फोडणी तडतडली की कांदा आणि कडीपत्ता घालून सोनेरी होईपर्यंत परता.
    2. आले-लसूण पेस्ट, हळद, लाल तिखट, धने-जिरे पूड आणि टोमॅटो, खोबरे, लसूण यांची केलेली पेस्ट घालून मसाला छान परता.
    3. छान सगळा भाजून घ्या मग त्यात थोडे पाणी घालून घट्ट रस्सा तयार करा.
    4. आता त्यात मीठ घालून २ मिनिटे उकळू द्या.
    5. मग त्यात शेव घालून लगेच मिक्स करा
    वरून कोथिंबीर टाका आपली शेव भाजी तयार. कोथिंबीरी सोबतच वरून बारीक चिरलेला कांदा आणि लिंबाचा रस टाकल्यास चव आणखी खुलते. ही भाजी ताजी गरम भाकरी, फुलका किंवा तव्यावरचा पराठा यांसोबत अप्रतिम लागते.
    धाब्यांवर ही भाजी साध्या पण तिखट मसाल्याने बनवली जाते. अनेक ठिकाणी त्यात थोडा कट मसाला किंवा गावठी मसाला घालून चवीला आणखी धार दिली जाते. काही ठिकाणी शेवभाजीमध्ये थोडीशी मटार किंवा चिरलेली कोबीदेखील वापरली जाते पण पारंपरिक धाबा स्टाइलमध्ये केवळ टोमॅटो आणि मसाले हेच मुख्य घटक असतात. पावसाळ्यात किंवा थंड वातावरणात गरम शेवभाजी आणि भाकरीचा स्वादिष्ट आस्वाद आणि अनुभव घरच्या घरी एकदा नक्की घ्या.
    view comments
    मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
    Shev Bhaji Recipe: ढाब्यासारखी झणझणीत शेवभाजी आता घरच्या घरी बनवा, जाणून घ्या सरळ सोपी रेसिपी...
    Next Article
    advertisement
    Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
    परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
      View All
      advertisement