Creta चा पडेल विसर, Hyundai आणतेय तिच्यापेक्षा सुपर SUV, फोटो पाहून पडाल प्रेमात!
- Published by:Sachin S
Last Updated:
क्रेटा Creta ही सर्वात लोकप्रिय एसयूव्ही ठरली. त्यानंतर Venue एसयूव्हीनं मार्केट चांगलंच काबीज केलं. आता Hyundai कंपनी Venue चं नवीन अपडेट मॉडेल घेऊन येत आहे.
दक्षिण कोरियन कंपनी हुंदई मोटर्स (Hyundai) ने गेल्या अनेक वर्षांपासून भारतामध्ये एकापेक्षा एक एसयूव्ही आणून भारतीयांची मन जिंकली. क्रेटा Creta ही सर्वात लोकप्रिय एसयूव्ही ठरली. त्यानंतर Venue एसयूव्हीनं मार्केट चांगलंच काबीज केलं. आता Hyundai कंपनी Venue चं नवीन अपडेट मॉडेल घेऊन येत आहे. Hyundai कंपनीने आपल्या Hyundai Venue 2025 बद्दल नवीन खुलासा केला आहे. यामध्ये फिचर्स आणि एसयूव्हीमधील टेक्नॉलाजीबद्दल माहिती दिली. ही नवीन Hyundai Venue 2025 4 नोव्हेंबरला लाँच होणार आहे.
advertisement
Hyundai Venue 2025 ही पुढील महिन्यात 4 नोव्हेंबर रोजी लाँच होणार आहे. नव्या Hyundai Venue 2025 मध्ये कनेक्टिव्हिटी, ड्रायव्हर असिस्टन्स इतर गोष्टींवर भर दिला आहे. Hyundai Venue 2025 ची बुकिंग डीलरशिप्सवर आणि कंपनीच्या साईटवर सुरू झाली आहे. 25,000 रुपयांच्या टोकन अमाऊंटवर ही नवीन Hyundai Venue 2025 बूक करता येईल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement


