Iran US Conflict: कच्च्या तेलासाठी इराणवर हल्ला? ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं, ''मी एक बिझनेसमन, त्यामुळं....''
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Iran War : इराणच्या अणू कार्यक्रमाला विरोध असल्याचे अमेरिका-इस्रायकडून सांगण्यात आले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेटच भाष्य केले आहे. आपल्यासाठी हे युद्ध एक बिझनेस (व्यापार) असल्याची स्पष्टोक्ती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
वॉशिंग्टन: अमेरिका-इस्रायलने इराण विरोधात युद्ध पुकारुन महिना उलटला आहे. या यु्द्धात निष्पाप नागरीक जखमी झाले असून अनेकजण मृत्यूमुखी पडले आहेत. युद्धामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे अमेरिकेच्या युद्धाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. इराणच्या अणू कार्यक्रमाला विरोध असल्याचे अमेरिका-इस्रायकडून सांगण्यात आले. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी थेटच भाष्य केले आहे. आपल्यासाठी हे युद्ध एक बिझनेस (व्यापार) असल्याची स्पष्टोक्ती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली.
माध्यमांशी संवाद साधताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र याकडे एक 'व्यापार' (Business) म्हणून पाहत असल्याचं स्पष्ट केलं आहे. इराणसोबत सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी असा डाव खेळला आहे, ज्याने जागतिक मुत्सद्देगिरीचे सर्व नियम हादरवून सोडले आहेत. "युद्धात जो जिंकतो, त्याचाच तिथल्या संसाधनांवर अधिकार असतो," असे म्हणत ट्रम्प यांनी इराणच्या तेल विहिरींवर कब्जा करण्याचे संकेत दिले आहेत.
advertisement
'मी आधी बिझनेसमन आहे!'
ट्रम्प यांनी आपली प्राथमिकता आर्थिक नफा असल्याचे मान्य करण्यास लपवाछपवी केली नसल्याचे दिसून आले. इराणच्या तेल संसाधनांबद्दल विचारले असता त्यांनी स्पष्ट केले की, "जर माझं चाललं, तर नक्कीच आम्ही ताबा घेऊ... कारण मी सर्वात आधी एक बिझनेसमन आहे." लष्करी कारवाईवर होणाऱ्या अब्जावधी डॉलर्सच्या खर्चाची भरपाई करण्याचा हाच एकमेव मार्ग असल्याचे त्यांचे मत आहे.
advertisement
व्हेनेझुएला मॉडेल आणि 'अमेरिकन टोल'
ट्रम्प यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी व्हेनेझुएलाचे उदाहरण दिले आहे. "आम्ही व्हेनेझुएलातून आधीच १०० दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेल काढले आहे, ज्यातून युद्धाचा खर्च निघून गेला," असा दावा त्यांनी केला. हेच मॉडेल आता इराणवर लागू करण्याची त्यांची योजना आहे. इतकेच नाही तर, जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग असलेल्या 'होर्मुजच्या सामुद्रधुनी'तून (Strait of Hormuz) जाणाऱ्या प्रत्येक व्यापारी जहाजाकडून अमेरिका 'टोल' वसूल करेल, असा धक्कादायक प्रस्तावही त्यांनी मांडला आहे.
advertisement
इराणची लष्करी स्थिती कमकुवत?
इराणच्या लष्करी शक्तीवर टीका करताना ट्रम्प म्हणाले की, "इराणकडे आता ना नौसेना उरली आहे, ना वायूसेना. ते आता प्रतिकार करण्याच्या स्थितीत नाहीत." जेव्हा शत्रू पूर्णपणे खचलेला असतो, तेव्हा विजेत्याकडे तिथल्या साधनसंपत्तीवर कब्जा करण्याचा पूर्ण अधिकार असतो, असा तर्क ट्रम्प यांनी मांडला आहे. ट्रम्प यांची ही 'ट्रान्झॅक्शनल फॉरेन पॉलिसी' आंतरराष्ट्रीय कायद्यांना आव्हान देणारी ठरत असून, आता इराण यावर काय प्रतिक्रिया देतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
Apr 07, 2026 2:57 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Iran US Conflict: कच्च्या तेलासाठी इराणवर हल्ला? ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं, ''मी एक बिझनेसमन, त्यामुळं....''









