advertisement

Air Conditioner : किती डिग्रीवर AC चालवला तर जास्त बचत होते? 90% लोक करतात ही चूक, जाणून घ्या परफेक्ट सेटिंग

Last Updated:
एसी तर वापरला, पण बिल इतकं कसं आलं? हा प्रश्न तुम्हालाही सतावत असेल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. एसी नक्की किती तापमानावर चालवल्यास तुमची 30% वीज वाचू शकते, याचं गणित आज आपण मांडणार आहोत.
1/8
एप्रिल महिना संपत आला की सूर्याचा पारा चढायला लागतो. दुपारी घराबाहेर पडणं तर सोडाच, पण घरात बसल्या जागी सुद्धा घामाच्या धारा वाहायला लागतात. अशा वेळी आपला सर्वात मोठा आधार असतो तो म्हणजे AC. ऑफिसमधून आल्यावर किंवा रात्री झोपताना आपण धावत जाऊन एसीचं बटण दाबतो आणि रिमोटवरचं तापमान थेट 18 अंशावर सेट करतो. आपल्याला वाटतं की 18 वर ठेवलं की खोली लवकर गार होईल, पण खरंच असं असतं का?

2/8
एसीच्या गारेगार हवेचा आनंद घेताना महिन्याच्या शेवटी जेव्हा हातामध्ये वीज बिल येतं, तेव्हा मात्र अंगाला पुन्हा घाम सुटतो. एसी तर वापरला, पण बिल इतकं कसं आलं? हा प्रश्न तुम्हालाही सतावत असेल, तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. एसी नक्की किती तापमानावर चालवल्यास तुमची 30% वीज वाचू शकते, याचं गणित आज आपण मांडणार आहोत.

3/8
18 की 27? काय आहे खरं गणित?अनेकांचा असा समज असतो की 18 डिग्रीवर एसी सेट केला की खोली झटपट थंड होते. पण विज्ञान असं सांगतं की, तुमच्या खोलीचं तापमान 26 अंशापर्यंत पोहोचायला लागणारा वेळ हा सारखाच असतो, मग तुम्ही रिमोट 18 वर सेट करा किंवा 26 वर. जेव्हा बाहेरचं तापमान 40 अंश असतं, तेव्हा शरीरासाठी 26 अंश तापमान सुद्धा पुरेसं सुखद आणि थंड असतं.

4/8
कॉम्प्रेसरचा खेळ आणि विजेची बचतजेव्हा तुम्ही तापमान खूप कमी ठेवता (उदा. 18 किंवा 20), तेव्हा एसीचा कॉम्प्रेसर (Compressor) ते तापमान गाठण्यासाठी सतत आणि जास्त वेळ चालतो. परिणामी वीज जास्त वापरली जाते. याउलट, जर तुम्ही तापमान 24 ते 27 च्या दरम्यान ठेवले, तर कॉम्प्रेसर कमी वेळ चालतो.

5/8
थर्मोस्टॅटची किमयाएकदा का खोलीत ठरवलेलं तापमान (उदा. 24 अंश) आलं की, कॉम्प्रेसर आपोआप बंद होतो आणि फक्त पंखा सुरू राहतो. जेव्हा पुन्हा तापमान वाढू लागतं, तेव्हा कॉम्प्रेसर पुन्हा सुरू होतो.
जर तुम्ही एसी 18 अंशाऐवजी 27 अंशावर चालवला, तर तुम्ही वर्षाला सुमारे 6,240 रुपयांपर्यंत बचत करू शकता. यातून वर्षाला साधारण 960 युनिट्स (kWh) विजेची बचत होऊ शकते.
थर्मोस्टॅटची किमयाएकदा का खोलीत ठरवलेलं तापमान (उदा. 24 अंश) आलं की, कॉम्प्रेसर आपोआप बंद होतो आणि फक्त पंखा सुरू राहतो. जेव्हा पुन्हा तापमान वाढू लागतं, तेव्हा कॉम्प्रेसर पुन्हा सुरू होतो. जर तुम्ही एसी 18 अंशाऐवजी 27 अंशावर चालवला, तर तुम्ही वर्षाला सुमारे 6,240 रुपयांपर्यंत बचत करू शकता. यातून वर्षाला साधारण 960 युनिट्स (kWh) विजेची बचत होऊ शकते.
advertisement
6/8
फक्त तापमानच नाही, 'या' गोष्टीही आहेत महत्त्वाच्यातुमचं वीज बिल केवळ तापमानावर अवलंबून नसतं, तर इतरही अनेक घटक त्यावर परिणाम करतात:
1. स्टार रेटिंग: तुमच्या एसीला किती स्टार्स आहेत (3 स्टार की 5 स्टार).
2. खोलीचा आकार: खोली किती मोठी आहे आणि त्यात किती लोक बसले आहेत.
3. इन्सुलेशन: खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे नीट बंद आहेत की नाही.
4. बाहेरचे तापमान: बाहेर जर प्रचंड ऊन असेल, तर एसीला आतलं तापमान टिकवून ठेवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते.
फक्त तापमानच नाही, 'या' गोष्टीही आहेत महत्त्वाच्यातुमचं वीज बिल केवळ तापमानावर अवलंबून नसतं, तर इतरही अनेक घटक त्यावर परिणाम करतात:1. स्टार रेटिंग: तुमच्या एसीला किती स्टार्स आहेत (3 स्टार की 5 स्टार).2. खोलीचा आकार: खोली किती मोठी आहे आणि त्यात किती लोक बसले आहेत.3. इन्सुलेशन: खोलीच्या खिडक्या आणि दरवाजे नीट बंद आहेत की नाही.4. बाहेरचे तापमान: बाहेर जर प्रचंड ऊन असेल, तर एसीला आतलं तापमान टिकवून ठेवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते.
advertisement
7/8
आरोग्य आणि वीज दोन्ही जपाअनेकांना एसी 18 वर लावून जाड चादर किंवा ब्लँकेट ओढून झोपण्याची सवय असते. तज्ज्ञांच्या मते, ही सवय केवळ विजेची नासाडीच नाही तर आरोग्यासाठीही अपायकारक आहे. मानवी शरीराचे सामान्य तापमान 36-37 अंश सेल्सिअस असते. बाहेर प्रचंड उष्णता आणि आत प्रचंड थंडी यामुळे शरीराचे संतुलन बिघडू शकते.

8/8
थोडक्यात काय तर वीज वाचवण्यासाठी आणि खिशाला कात्री लागू नये म्हणून एसी मध्यम तापमानावर म्हणजेच 24 ते 26 अंशावर चालवा. यामुळे तुम्हाला थंडावा तर मिळेलच, पण महिन्याच्या शेवटी येणाऱ्या बिलाचं टेन्शनही दूर होईल.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement