advertisement

अनंत अंबानींतर्फे ६ कोटींची देणगी आणि राजराजेश्वरम मंदिराच्या नूतनीकरणासाठी १२ कोटींची घोषणा

Last Updated:
अनंत अंबानी यांनी केरळमधील राजराजेश्वरम आणि गुरुवायूर मंदिरांसाठी एकूण १८ कोटी देणगी जाहीर केली, जीर्णोद्धार आणि हत्तींसाठी रुग्णालय व साखळदंडमुक्त निवारा उभारणार.
1/7
रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी नुकतीच केरळमधील अत्यंत खास आणि प्रसिद्ध राजराजेश्वरम आणि गुरुवायूर मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतलं. या भेटीदरम्यान त्यांनी दोन्ही मंदिरांच्या विकासासाठी आणि परंपरांच्या जतनासाठी एकूण १८ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.

2/7
यामध्ये मंदिरांचा जीर्णोद्धार आणि हत्तींच्या कल्याणासाठीच्या विशेष योजनांचा समावेश आहे. तळीपरंबा येथील ऐतिहासिक राजराजेश्वरम मंदिराला भेट दिली असता, अनंत अंबानी यांनी पारंपारिक विधी पार पाडले. यावेळी त्यांनी मंदिराच्या नूतनीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा धनादेश सुपुर्द केला.

3/7
सर्वात मोठी घोषणा ठरली ती मंदिराच्या पूर्व गोपुराच्या जीर्णोद्धाराची. गेल्या दोन शतकांपासून दुरवस्थेत असलेल्या या ऐतिहासिक गोपुराच्या पुनर्रचनेसाठी त्यांनी १२ कोटी रुपयांचा निधी देण्याचे वचन दिले आहे. यामुळे या पुरातन वास्तूचा वारसा जपला जाणार असून भाविकांसाठी पार्किंग आणि इतर आधुनिक सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातील.

4/7
अनंत अंबानी यांनी गुरुवायूर मंदिरातही ३ कोटी रुपयांची देणगी दिली. पण चर्चेचा विषय ठरला तो त्यांच्या वंतारा उपक्रमांतर्गत हत्तींसाठी घेतलेला पुढाकार. प्राण्यांवर मनापासून प्रेम करणाऱ्या अनंत अंबानींनी गुरुवायूरमधील मंदिर हत्तींसाठी विशेष योजना जाहीर केल्या आहेत.

5/7
हत्तींसाठी एक सुसज्ज समर्पित रुग्णालय उभारले जाणार. हत्तींना साखळदंडात जखडून ठेवण्याऐवजी साखळदंडमुक्त निवारा तयार केला जाणार. वैज्ञानिक पद्धतीने हत्तींची काळजी घेण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा पुरवल्या जाणार.

6/7
या प्रसंगी बोलताना अनंत अंबानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
या प्रसंगी बोलताना अनंत अंबानी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. "भारताच्या आध्यात्मिक परंपरा या केवळ पूजेची ठिकाणे नसून निसर्गाशी नाते जोडणाऱ्या जिवंत संस्था आहेत. हा वारसा भावी पिढ्यांसाठी जतन करणे ही आपली जबाबदारी आहे.
advertisement
7/7
 'वंतारा'च्या माध्यमातून आम्ही मंदिरांच्या परंपरांचा भाग असलेल्या प्राण्यांची सेवा पूर्ण सन्मानाने आणि करुणेने करण्याचा प्रयत्न करत आहोत,
'वंतारा'च्या माध्यमातून आम्ही मंदिरांच्या परंपरांचा भाग असलेल्या प्राण्यांची सेवा पूर्ण सन्मानाने आणि करुणेने करण्याचा प्रयत्न करत आहोत," असे त्यांनी नमूद केले.अनंत अंबानींचे हे योगदान केवळ एका देणगीपुरते मर्यादित नसून, ते भारताच्या प्राचीन मूल्यांना आणि आधुनिक सेवाभावाला जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरले आहे.
advertisement
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement