भगवान विष्णूंना प्रिय, पण बद्रीनाथ मंदिरात शंख वाजवण्यास सक्त मनाई, काय आहे नेमकं कारण?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
उत्तराखंडमधील चार धामांपैकी एक असलेल्या बद्रीनाथ धाम मंदिरात भगवान विष्णूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात शंख फुंकणे अत्यंत शुभ मानले जाते आणि शंखाचा ध्वनी देवांना प्रिय असतो, असे म्हटले जाते. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे बद्रीनाथ मंदिरात शंख वाजवण्यास सक्त मनाई आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बद्रीनाथ मंदिर हे हिमालयाच्या अत्यंत उंचावर आणि बर्फाच्छादित डोंगररांगांमध्ये स्थित आहे. वैज्ञानिकांच्या मते, शंख वाजवल्याने निर्माण होणाऱ्या ध्वनी लहरींची वारंवारता खूप जास्त असते. जर हा नाद तिथे केला, तर डोंगरांवरील बर्फामध्ये कंपनं निर्माण होऊन 'हिमस्खलन' होण्याचा किंवा बर्फात भेगा पडण्याचा मोठा धोका असतो.
advertisement
बद्रीनाथमध्ये शंख न वाजवण्याची एक कथा शास्त्रांमध्ये आढळते. एकदा देवी लक्ष्मीजी बद्रीनाथच्या तुलसी भवनात ध्यान करत होत्या. त्यावेळी भगवान विष्णूने शंखचूर्ण नावाच्या राक्षसाचा वध केला. हिंदू धर्मात विजय झाल्यावर शंख वाजवला जातो परंतु विष्णूजींना लक्ष्मीजींच्या ध्यानात अडथळा आणायचा नव्हता म्हणून त्यांनी शंख वाजवला नाही.
advertisement










