‘बायको गॅलरीतून पडली’ सांगत पतीकडून पत्नीची हत्या, पुण्यातील घटनेनं खळबळ!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे : पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं पत्नीची हत्या करून ती गॅलरीतून पडल्याचा बनाव केला. मात्र त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
शुभम श्रीकांत घोडके असं अटक केलेल्या २९ वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. तर सारीका शुभम घोडके असं हत्या झालेल्या २३ वर्षीय विवाहितेचं नाव आहे. आरोपी शुभम हा मागील काही दिवसांपासून सारीकावर चारित्र्याचा संशय घेत होता. यातूनच ही हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम घोडके हा पत्नी सारिका हिच्यावर वारंवार चारित्र्याचा संशय घेत होता. यावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. याच वादातून शुभमने संतापाच्या भरात सारिकाला बेदम मारहाण केली. त्यानंतर धारदार शस्त्राने तिच्यावर वार करत गंभीर जखमी केले. गंभीर जखमी अवस्थेत आरोपीनं सारीकाला तत्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
advertisement
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात पोलिसांना पतीवर संशय आला. याबाबत विचारणा केली असता आरोपीने ‘पत्नी गॅलरीतून पडल्याने मृत्यू झाला’ असा दावा केला. मात्र घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे आणि जखमांचे स्वरूप यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
यानंतर पोलिसांनी शुभम घोडके याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Apr 07, 2026 1:18 PM IST









