'तारक मेहता' शोमधील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, दिशा वकानीशी अत्यंत जवळचं नातं
- Published by:Minal Gurav
Last Updated:
तारक मेहता शोमधील प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. अभिनेत्याचं अभिनेत्री दिशा वकानीशी अत्यंत जवळचं नातं आहे.
advertisement
advertisement
'तारक मेहता का...' चे निर्माते असित मोदी यांनी सोशल मीडियावर ही बातमी शेअर करून आपले दुःख व्यक्त केले. ज्येष्ठ अभिनेते भीम वकानी यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. दिशा वकानीच्या वडिलांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता आणि दिशा वकानीच्या मालिकेतही त्यांची विशेष भूमिका होती.
advertisement
'तारक मेहता का उल्टा चश्मा'चे निर्माते असित मोदी यांनी सांगितले की, भीम वकानी एक उत्कृष्ट अभिनेते, दिग्दर्शक आणि चित्रकार होते. ज्यांनी आपल्या कामातून इंडस्ट्रीत स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं होतं. जेव्हा जेव्हा ते मुंबईला येत तेव्हा ते असित मोदींना भेटत असत आणि त्या दोघांमध्ये एक घनिष्ठ नातं होतं. त्यांनी या मालिकेच्या एका भागात जेठालालच्या बापूजींच्या मित्राची भूमिका साकारली होती.
advertisement
advertisement
advertisement
advertisement








