advertisement

पुण्यात पुन्हा भीषण अपघात, भरधाव टँकरने तरुणीला चिरडलं

Last Updated:

पुण्याच्या राहीजा गार्डन्स परिसरातून पुणे कॅन्टोन्मेंट लष्करी भागाकडे जाणाऱ्या पुलाजवळ भीषण अपघात घडला आहे. इथं टँकरने तरुणीला चिरडलं आहे.

पुण्यात तरुणीला टँकरने चिरडलं
पुण्यात तरुणीला टँकरने चिरडलं
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: मागील काही दिवसांपासून पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवड परिसरात एका सिमेंट मिक्सरने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीला चिरडलं होतं. याबाबतचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला होता. ज्यात एक भरधाव मिक्सर तरुणीला चिरडताना दिसून आलं होतं. अपघाताची ही घटना ताजी असताना आता पुण्यात आणखी एक अपघात घडला आहे. ज्यात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना पुण्याच्या राहीजा गार्डन्स परिसरातून पुणे कॅन्टोन्मेंट लष्करी भागाकडे जाणाऱ्या पुलाजवळ घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने रस्ता ओलांडत असलेल्या महिलेस जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून टँकर चालकाला ताब्यात घेण्यात आलं असल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे या भागात यापूर्वीही अशाच प्रकारचे अपघात घडले असल्याने स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. तरीही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, अशी नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
advertisement
स्थानिकांनी या परिसरात वेगमर्यादा नियंत्रण, सिग्नल व्यवस्था आणि वाहतूक पोलिसांची कडक तैनाती करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात पुन्हा भीषण अपघात, भरधाव टँकरने तरुणीला चिरडलं
Next Article
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री
  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement