Share Market Prediction: शेअर बाजारात मंगळवारी मोठा खेळ, होणार ब्लॉक डील; कोणते शेअर्स ठरणार ‘हिरो’ अन् ‘झिरो’ संपूर्ण यादी
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market Prediction: मंगळवारी शेअर बाजारात मोठी हालचाल अपेक्षित आहे. तिमाही निकालांनंतर गुंतवणूकदारांची नजर आता Sona BLW, JK Tyre, IOC, Mazagon Dock आणि Aditya Birla Capital सारख्या आघाडीच्या कंपन्यांच्या शेअर्सवर आहे.
मुंबई: सोमवार २७ ऑक्टोबर रोजी बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी त्यांच्या तिमाही निकालांबाबत आणि मोठ्या घडामोडींविषयी माहिती दिली आहे. त्यामुळे मंगळवार २८ ऑक्टोबर रोजी बाजार उघडल्यावर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये हालचाल (action) दिसू शकते.
Sona BLW Precision Forgings Ltd
advertisement
कंपनीने जाहीर केले की वित्त वर्ष २०२६ च्या दुसऱ्या तिमाहीत तिचा नफा २०% वाढून १७३ कोटींवर पोहोचला आहे. जो मागील वर्षी याच तिमाहीत १५२ कोटी होता. एकूण उत्पन्नातही २३.४% वाढ झाली असून ते ९२२ कोटींवरून १,१३८ कोटींवर पोहोचले आहे. सोमवारी कंपनीचा शेअर १.१५% वाढीसह ४८४.२० वर बंद झाला.
advertisement
JK Tyre & Industries
कंपनीचा तिमाही नफा ६४% वाढून २२१ कोटींवर पोहोचला, तर मागील वर्षी याच तिमाहीत तो १३५ कोटी होता.एकूण उत्पन्नात १०.८% वाढ होऊन ते ४,०११ कोटींवर पोहोचले (मागील वर्षी ३,६२१ कोटी).कंपनीचा शेअर सोमवारी ०.५०% वाढीसह ४१४ वर बंद झाला.
advertisement
Adani Energy Solutions
कंपनीचा तिमाही नफा २०.७% घटून ५३४ कोटींवर आला आहे, जो मागील वर्षी ६७५ कोटी होता.मात्र एकूण उत्पन्नात ६.७% वाढ होऊन ते ₹६,५९५ कोटींवर पोहोचले (मागील वर्षी ६,१८३ कोटी). कंपनीचा शेअर सोमवारी ०.०८५% वाढीसह ९४५.०५ वर बंद झाला.
advertisement
Canara Robeco
कंपनीचा तिमाही नफा ३% घटून ४८.७१ कोटींवर आला (मागील वर्षी ५०.०४ कोटी). एकूण उत्पन्न थोडं वाढून १०८ कोटी झाले, जे मागील वर्षी १०४ कोटी होते.
Jubilant Ingrevia
कंपनीचा नफा १७.८% वाढून ७० कोटींवर पोहोचला (मागील वर्षी ५९ कोटी). एकूण उत्पन्नातही ७.२% वाढ होऊन ते १,१२०.७ कोटी झाले (मागील वर्षी १,०४५.२ कोटी). कंपनीचा शेअर सोमवारी ०.०३७% वाढीसह ६७७.९५ वर बंद झाला.
advertisement
Indian Oil Corporation (IOC)
कंपनीचा तिमाही नफा ७,६१० कोटींवर पोहोचला, जो मागील तिमाहीत ५,६८८ कोटी होता. मात्र एकूण उत्पन्न १.९२ लाख कोटींवरून घटून १.७९ लाख कोटींवर आले. सोमवारी कंपनीचा शेअर ३.२३% वाढीसह १५५.२३ वर बंद झाला.
Raymond Ltd
कंपनीचा नफा ७६% घसरून १४ कोटींवर आला (मागील वर्षी ५९ कोटी). एकूण उत्पन्न ११.४% वाढून ५२७.७ कोटी झाले (मागील वर्षी ४७३.५ कोटी).
advertisement
Bata India Ltd
कंपनीचा तिमाही नफा ७३.२% घसरून १४ कोटींवर आला (मागील वर्षी ५२ कोटी). एकूण उत्पन्न ४.३% घटून ८०१ कोटी झाले (मागील वर्षी ८३७.१ कोटी). सोमवारी शेअर ०.२७% वाढीसह १,१६८.२० वर बंद झाला.
Rail Vikas Nigam Ltd (RVNL)
कंपनीला नॉर्थ ईस्टर्न रेल्वेकडून १६५ कोटींचा नवीन ऑर्डर मिळाला आहे, जो पुलांच्या बांधकामासाठी आहे. कंपनीचा शेअर सोमवारी ०.०९१% वाढीसह ३२९.७५ वर बंद झाला.
Dilip Buildcon Ltd
कंपनीला तमिळनाडूमधील पारामकुडी-रामनाथपुरम सेक्शन (NH-49 / NH-87) या चार लेन महामार्ग प्रकल्पासाठी L-1 बोलीदार (Lowest Bidder) घोषित करण्यात आले आहे. प्रकल्पाची एकूण किंमत ८७९.३० कोटी (GST वगळून) असून तो हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल (HAM) वर विकसित होईल. प्रकल्पाची एकूण लांबी ४६.६६५ किलोमीटर आहे.
Tamilnad Mercantile Bank
कंपनीचा तिमाही नफा ४.७% वाढून ₹३१८ कोटींवर पोहोचला (मागील वर्षी ३०३ कोटी). नेट इंटरेस्ट इन्कम ०.२% वाढून ५९७.१ कोटी झाली (मागील वर्षी ५९६ कोटी). सोमवारी शेअर १.५२% वाढीसह ४५७ वर बंद झाला.
Kfin Technologies
कंपनीचा नफा ४.५% वाढून ९३ कोटींवर पोहोचला (मागील वर्षी ८९ कोटी). एकूण उत्पन्नात १०.३% वाढ होऊन ते ३०९.२ कोटी झाले (मागील वर्षी २८०.४ कोटी).
Indus Towers
कंपनीचा नफा १७.३% घटून १,८३९ कोटींवर आला (मागील वर्षी २,२२४ कोटी). मात्र उत्पन्नात ९.७% वाढ होऊन ते ८,१८८ कोटी झाले (मागील वर्षी ७,४६५ कोटी).
Mazagon Dock Shipbuilders
कंपनीचा नफा २८.१% वाढून ७४९ कोटींवर पोहोचला (मागील वर्षी ५८५ कोटी). एकूण उत्पन्न ६.३% वाढून २,९२९ कोटी झाले (मागील वर्षी २,७५६ कोटी). कंपनीने ६ प्रति शेअर अंतरिम लाभांश जाहीर केला आहे.
Aditya Birla Capital
मंगळवारी शेअर बाजारात मोठी ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, JOMEI Investments (Advent) कंपनी Aditya Birla Capital (AB Capital) मधील ५.३२ कोटी शेअर्स (सुमारे २.०४% हिस्सेदारी) विकणार आहे. या डीलचा फ्लोअर प्राइस ३०४.५५ प्रति शेअर ठरवण्यात आला आहे, जो सध्याच्या बाजारभावापेक्षा २% डिस्काउंटवर आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 27, 2025 11:52 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market Prediction: शेअर बाजारात मंगळवारी मोठा खेळ, होणार ब्लॉक डील; कोणते शेअर्स ठरणार ‘हिरो’ अन् ‘झिरो’ संपूर्ण यादी


