Pune Metro : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! बिनधास्त करा 'न्यू इअर' साजरं, रात्रभर धावणार मेट्रो, पाहा वेळापत्रक
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे मेट्रोने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे
पुणे : पुणेकरांसाठी ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनचा आनंद द्विगुणित करणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पुणे मेट्रोने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मेट्रोने आज रात्रभर सेवा सुरू ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रवाशांची वाढती मागणी आणि संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पुणे महामेट्रोने हे पाऊल उचलले आहे.
मेट्रोच्या विशेष वेळेचे नियोजन:
आज, ३१ डिसेंबर रोजी नियमित सेवा संपल्यानंतर म्हणजेच रात्री ११ वाजल्यापासून ते उद्या सकाळी ६ वाजेपर्यंत मेट्रो सातत्याने धावणार आहे. या काळात दर २० मिनिटांच्या अंतराने मेट्रोच्या फेऱ्या होतील. मात्र, प्रवाशांची गर्दी वाढल्यास या फेऱ्यांची वारंवारिता गरजेनुसार वाढवण्यात येईल, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. उद्या सकाळी ६ नंतर मेट्रोची सेवा पुन्हा नियमित वेळापत्रकानुसार सुरू होईल.
advertisement
का घेण्यात आला हा निर्णय?
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि सार्वजनिक ठिकाणांवर मोठी गर्दी होते. अशा वेळी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका व्हावी आणि मद्यपान करून गाडी चालवण्याचे प्रकार टाळता यावेत, यासाठी सुरक्षित प्रवासाचा पर्याय म्हणून मेट्रो सुरू ठेवण्याची मागणी होत होती. मुंबई मेट्रोच्या धर्तीवर आता पुणेकरांनाही ही 'नाईट मेट्रो' सेवा मिळणार आहे.
advertisement
रात्रभर चालणाऱ्या या सेवेसाठी मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा रक्षक आणि सीसीटीव्ही यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तसेच पुणे पोलिसांनी मेट्रो प्रशासनाच्या मदतीसाठी विशेष पोलीस बंदोबस्तही लावला आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये मेट्रोच्या प्रवाशांनी २.५३ लाखांचा टप्पा ओलांडल्याने, आजच्या रात्री हा आकडा नवा विक्रम प्रस्थापित करण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 1:11 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Metro : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! बिनधास्त करा 'न्यू इअर' साजरं, रात्रभर धावणार मेट्रो, पाहा वेळापत्रक










