ऑक्टोबरमधील शेवटची सुट्टी
दरवर्षी ३१ ऑक्टोबर हा दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती म्हणून 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा केला जातो. सरदार पटेलांना 'भारताचे लोहपुरुष' म्हटले जाते, कारण स्वातंत्र्यानंतर त्यांनी देशातील ५६२ संस्थानांना एकत्र करून भारत घडवण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. याच कारणामुळे ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी केवळ गुजरात राज्यात बँकांमध्ये सुट्टी असेल. इतर सर्व राज्यांमध्ये बँका नियमितपणे सुरू राहतील
advertisement
नोव्हेंबरमधील महत्त्वाच्या सणांच्या सुट्ट्या
नोव्हेंबर महिन्यात अनेक महत्त्वाचे प्रादेशिक आणि राष्ट्रीय सण आहेत, ज्यामुळे विविध राज्यांमध्ये बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. १ नोव्हेंबर रोजी दिवशी कर्नाटक राज्योत्सव असल्याने कर्नाटक राज्यात बँका बंद राहतील. हा दिवस राज्याच्या स्थापनेची वर्षगांठ म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी उत्तराखंडमध्ये इगास-बगवाल या सणानिमित्त बँका बंद असतील.
५ नोव्हेंबर हा दिवस गुरु नानक जयंती/कार्तिक पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या राष्ट्रीय महत्त्वाच्या सणानिमित्त दिल्ली, चंदीगड, मुंबई, पुणे, कोलकाता, भोपाळ, हैदराबादसह देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल. ७ नोव्हेंबरला मेघालयातील गारो जमातीचा वांगला उत्सव असतो. यामुळे शिलॉंग येथे बँका बंद राहतील.
८ नोव्हेंबर हा दिवस दुसरा शनिवार असल्यामुळे देशभरातील सर्व बँका बंद राहतील. याच दिवशी कर्नाटकात कनकदास जयंती (कवी, संत आणि समाजसुधारक कनकदास यांची जयंती) निमित्तही सुट्टी असेल. ११ नोव्हेंबरला ल्हाबाब दुचेन या बौद्ध धर्माच्या प्रमुख सणानिमित्त केवळ सिक्कीममध्ये बँका बंद राहतील. याव्यतिरिक्त, नोव्हेंबर महिन्यात नियमितपणे येणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्यांमध्ये २, ९, १६, २२, २३ रविवार आणि ३० नोव्हेंबर रविवार या दिवशीही बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
डिजिटल सेवा सुरू राहणार
ATM नेट बँकिंग राहणार बंद
या सर्व सुट्ट्या असल्या तरी, ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही. कारण एटीएम (ATM), इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग यांसारख्या सर्व डिजिटल सेवा या काळातही २४ तास सुरू राहतील. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सर्व आर्थिक व्यवहार कोणत्याही अडथळ्याशिवाय करू शकता. तरीही, अत्यावश्यक कामासाठी बँक शाखेत जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासून घ्या.
