मुंबई : सध्या कडक उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात घट्ट कापडे वापरले तर त्वचेवर पुरळ उठते. स्किन इन्फेक्शन होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक महिला कॉटनचे कपडे वापरणे पसंत करतात. यामध्ये कॉटन कुर्ती घालण्याला मोठी पसंती दिली जाते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात कॉटन कुर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येते. त्यामुळे तुम्ही कॉटन कुर्तीचा व्यवसाय या काळात सुरु करू शकता. तुम्हाला जर सुरुवातीला कमी बजेटमध्ये घरातून व्यवसाय सुरू करायाचा असेल तर फक्त 2 ते 3 हजार रुपयांच्या बजेटमध्येही व्यवसाय सुरु करता येईल. तो सुरु कसा करायचा याबद्दलच आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहेत.
advertisement
कुठे खरेदी कराल कुर्ती?
मुंबईतील दादर परिसरातील जनता मार्केट म्हणजे एक शॉपिंग हब. या मार्केटमध्ये अगदी बेडशीटपासून ते महिला आणि पुरुषांच्या कपड्यांपर्यंत होलसेल दुकानं इथे तुम्हाला बघायला मिळतील. जनता मार्केटमध्ये कुर्तींची अशी बरचशी होलसेल दुकाने पाहायला मिळतील जिथे फक्त महिलांची 100 रुपयांपासून कुर्ती तुम्ही खरेदी करू शकता. या दुकानांपैकीच एक आलम गरमड शॉप हे एक आहे. या ठिकाणी कॉटन, खादी, पार्टीवेअर, चिकनकारी, लखनवी चिकन कुर्ती अशा अनेक प्रकारच्या कुर्ती तुम्हाला इथे बघायला मिळतील. या तुम्ही जास्त संख्येनं कुर्ती खरेदीसाठी तर येऊच शकता. पण सोबतच तुम्हाला जर कुर्तीचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर खरेदी करू शकता.
काय आहेत कुर्तीच्या किंमती?
कॉटन कुर्ती 100 रुपये, खादी कुर्तीची 100 रुपये, लखनवी चिकनकारी कुर्ती 240 रुपये, रेयॉन फॅब्रिक कुर्ती 140 रुपये चिकन कुर्ती 190 रुपये, डिजिटल प्रींट कुर्ती 160 रुपये ,पार्टी वेअर कॉटन ड्रेस 550 रुपये तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पॅटर्नच्या कुर्ती, 2 पीस 3 पीस ड्रेस तुम्हाला इथे बघायला मिळतील.
उन्हाळ्यात वापरा ‘हे’ अत्तर अन् रहा सुगंधी; स्वस्तात मस्त करा पुण्यात या ठिकाणी खरेदी PHOTOS
कमी बजेटमध्ये व्यवसाय कसा सुरु कराल?
तुमचं जर 2 किंवा 3 हजार रुपयांचं बजेट असेल तर तुम्ही 100 किंवा 150 रुपयांपासून सुरु होणाऱ्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या कुर्ती खरेदी करून व्यवसाय सुरु करू शकता. सुरुवातीला तुम्हाला घरातून हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर 2000 रुपयांच्या बजेेटमध्ये तुम्ही 12 ते 15 कुर्ती खरेदी करु शकता आणि जसा जसा तुम्हाला ग्राहकांचा प्रतिसाद येईल तसा तुम्ही खरेदीचा आकडा वाढवू शकता. शिवाय एखादा कुर्ती पॅटर्न विकला जात नसेल तर तुम्ही तो परत करून दुसराही घेऊ शकता. त्यामुळे मोठ्या रक्कमेत नुकसान न होता व्यवसायाची सुरुवातही होऊ शकते आणि खरेदी-विक्रीची एक आयडियाही नक्कीच समजू शकते, असं विक्रेता आलम खान यांनी सांगितलं.