पोळी लाटण्याचं काम सोडून घेतला बॅग विकण्याचा निर्णय; डोंबिवलीच्या बॅगवाल्या मावशींची प्रेरणादायी कहाणी
- Published by:News18 Marathi
- Reported by:Mayuri Sarjerao
Last Updated:
डोंबिवलीतील बबिता चव्हाण गेल्या 15 वर्षांपासून बॅग विकण्याचे काम करत आहेत. त्यामुळे बबिता चव्हाण यांना डोंबिवलीच्या फेमस बॅगवाली मावशी या नावाने सर्वजण ओळखतात.
स्त्रियांनी आज प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. पुरुषांच्या बरोबरीने आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात वावरत आहेत. यामध्ये व्यवसाय क्षेत्रही मागे नाही. डोंबिवलीतील बबिता चव्हाण गेल्या 15 वर्षांपासून बॅग विकण्याचे काम करत आहेत. त्यामुळे बबिता चव्हाण यांना डोंबिवलीच्या फेमस बॅगवाली मावशी या नावाने सर्वजण ओळखतात.
advertisement
कारण या मावशींचं डोंबिवलीमध्ये बॅगच एक दुकान आहे. मुख्य म्हणजे मावशींनी त्यांच्या दुकानाचं नावही बॅगवाली मावशी असंच ठेवलं आहे. या मावशींच्या दुकानात राजस्थानी भरजरी वर्क असलेल्या बॅगेपासून ते ज्यूटच्या बॅगेपर्यंत तसेच खणाच्या पर्स पासून ते साडीच्या पदराच्या बॅगपर्यंत सगळ्या पॅटर्नच्या बॅग मिळतात. या बॅग कमी किमतीत तुम्हाला इथे खरेदी करता येतील.
advertisement
advertisement
सुरुवातीला जास्त भांडवल नसल्यानं त्यांनी 15 रुपयांच्या छोट्या पर्सपासून व्यवसायाला सुरुवात केली. आणि पाहता पाहता आज स्वत:चं मोठं दुकान त्यांनी उभं केलं आहे. म्हणून मावशींनी त्यांच्या दुकानाला बॅगवाली मावशी असचं नावही दिलं. आज मावशींकडे त्याच 15 रुपयांच्या बॅग पासून ते 500 ते 600 रुपयांपर्यंतच्या अनेक पॅटर्नच्या बॅग आहेत.
advertisement
बबिता मावशींकडे ज्यूटच्या वेगवेगळ्या पॅटर्नच्या बॅगची किंमत फक्त 80 ते 100 रुपयांपासून सुरु होते. पुढे बॅगच्या आकारानुसार किंमत बदलत जाते. राजस्थानी भरजरी वर्क असलेल्या बॅगची किंमत फक्त 120 ते 200 रुपयांपासून सुरु होते. ज्या बॅग ऑनलाईन किंवा इतर बाजारात तब्बल 400 ते 500 रुपयांच्या घरात मिळतात. तसेत यातील सगळ्यात मोठ्या आकारची बॅगेची किंमत ही 500 ते 600 रुपयांपासून सुरु होते.
advertisement
खणाचे मोबाईल कव्हरची किंमत फक्त 30 ते 40 रुपयांपसून सुरु होते. एवढचं काय तर राजस्थानी वर्क असलेल्या साईड पर्सची किंमत फक्त 80 ते 100 रुपयांपासून सुरु होते. मावशींच्या दुकानात सगळ्याच बॅगची रिटेल किंमत तुम्हाला होलसेल किंमतीप्रमाणेच बघायला मिळतील. त्यामुळे शक्यतो अख्ख्या डोंबिवलीमध्ये या बॅगवाल्या मावशी एवढ्या फेमस आहे.
advertisement
advertisement