APMC Market: चिकनपेक्षा शेवगा महाग, डाळिंबानं खाल्ल मार्केट, रविवारी असं का घडलं?

Last Updated:

APMC Market: राज्यातील कृषी मार्केटमध्ये मालाची आवक आणि दरांत मोठे उलटफेर दिसले. डाळिंब, शेवगा आणि गुळाचे बाजारभाव जाणून घेऊ.

+
APMC

APMC Market: चिकनपेक्षा शेवगा महाग, डाळिंबानं खाल्ल मार्केट, रविवारी असं का घडलं?

मुंबई: डिसेंबरअखेर राज्यातील कृषी मार्केटमध्ये मोठे उलटफेर दिसत आहेत. रविवार, दिनांक 28 डिसेंबर रोजी राज्यातील विविध कृषी मार्केटमध्ये मालाची आवक कमी-जास्त राहिली. आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गूळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक आणि त्यांचे दर याबाबत अपडेट जाणून घेऊ.
गुळाच्या आवकेत सुधारणा 
राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 3823 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी सांगली बाजारात 2697 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4165 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 360 क्विंटल गुळास 4501 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
advertisement
शेवग्याची आवक 
राज्याच्या मार्केटमध्ये आज केवळ 4 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी पुणे बाजारात सर्वाधिक 3 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 35000 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये आवक झालेल्या 1 क्विंटल शेवग्यास 10000 ते 20000 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळाला.
डाळिंबाची आवक दबावात 
गेल्या अनेक दिवसांपासून बाजारातील डाळिंबाची आवक कमीच आहे. यामुळे डाळिंबाचे भाव चांगलेच कडाडले आहेत. आज राज्याच्या मार्केटमध्ये केवळ 12 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक पुणे बाजारात राहिली. त्यास 15000 रुपये बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
APMC Market: चिकनपेक्षा शेवगा महाग, डाळिंबानं खाल्ल मार्केट, रविवारी असं का घडलं?
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement