छ. संभाजीनगरच्या अर्णवला राष्ट्रीय बालवीर पुरस्कार, कार्य पाहून राष्ट्रपतींनीही केलं कौतुक
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 20 मुलांना वितरण करण्यात आलेले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील अर्णव महर्षी याला देखील हा बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर: नुकतंच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बालवीर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 20 मुलांना वितरण करण्यात आलेले आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील अर्णव महर्षी याला देखील हा बाल पुरस्कार देण्यात आलेला आहे. अर्णवने दोन संशोधन केलेल्या आहेत त्यासाठी त्याला पेटंट देखील जाहीर झालेला आहे. त्याकरता त्याला पुरस्कार देण्यात आलेला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरातील 17 वर्षीय महर्षी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. 19 मे 2022 रोजी उत्तराखंडात भीषण अपघात झाला. 11 दिवस मी कोमात होतो. डाव्या डोळ्याची नस पूर्णतः खराब झाली. 6 दात तुटले, जबड्याची हाडे मोडली, शरीर पूर्णतः पॅरालाइज्ड झाले होते. गेल्या 3 वर्षांत रुग्णालयांत उपचारांसाठी जाताना रुग्णांची परिस्थिती पाहून रिस्ट बँड बनवण्याची प्रेरणा मिळाली.
advertisement
अर्णव अपघातामुळे अनेक दिवस व्हिलचेअरवरच होता. 'पॅरालाइज' झालेली बाजू पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करीत होता. तेव्हा, त्याला जाणवले की, कमजोर हाताचा उपयोग केल्यास लवकर ताकद येते. त्यामुळे डॉक्टर कमजोर हाताचा वापर करण्यासाठी रुग्णाचा सुदृढ हात बांधतात. त्याचा विचार करून अर्णवने यंत्र शोधले. हे यंत्र कमजोर हाताचा वापर करण्याची रुग्णाला सतत आठवण करून देते. व्हायब्रेटरी फिडबॅक देते. 'रिस्ट बॅण्ड' असलेले हे यंत्र कुठेही घेऊन जाता येते.
advertisement
2023 मध्ये कॉम्पोनंट मायक्रोकंट्रोलर, लिथियम बॅटरी व व्हायब्रेशन मोटर यांचा वापर करून यंत्र बनवले, तेव्हा अर्णव नऊवीत होता. अर्णवने एक ॲप्लिकेशन विकसित केले आहे. त्याचे नावही 'फेअर चान्स' म्हणजे फाइन मोटार्स एआय रिहॅबिलिटेशन चान्स असे ठेवले. जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार झाला तेव्हा खूप आनंद झाला होता. ह्या पुरस्कारामुळे माझी जन्मतारी अजून वाढलेली आहे भविष्यामध्ये देखील मला या रुग्णांसाठी नवनवीन संशोधन करत राहायचे आहे. माझ्या यशामध्ये माझी आई आजी आजोबा मामा यांचा खूप मोठा योगदान आहे. असं अर्णव म्हणाला आहे.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
Dec 28, 2025 8:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छ. संभाजीनगरच्या अर्णवला राष्ट्रीय बालवीर पुरस्कार, कार्य पाहून राष्ट्रपतींनीही केलं कौतुक










