advertisement

T20 World Cup : फायनलमध्ये टीम इंडियाचा 'अनलकी' अंपायर असणार का नाही? ICC ने दिली मोठी अपडेट!

Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडवर 7 रननी रोमांचक विजय मिळवला आहे, याचसोबत भारताने लागोपाठ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे.
1/8
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 253 रन केले, इंग्लंडची टीम भारताने दिलेल्या या आव्हानाच्या जवळ येऊन पोहोचली, पण आव्हान पार करण्यात त्यांना यश आलं नाही. 20 ओव्हरमध्ये इंग्लंडने 253 रन केले.

2/8
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. याआधी पहिल्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून फायनलमध्ये प्रवेश केला होता.

3/8
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात रविवार 8 मार्चला टी-20 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही हाय व्होल्टेज लढत रंगणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीने अंपायर आणि मॅच रेफ्रीची घोषणा केली आहे.

4/8
टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रिचर्ड कॅटलब्रो अंपायर असणार का नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता, कारण भारतीय क्रिकेट चाहते कॅटलब्रो यांना अनलकी अंपायर समजतात. नॉक आऊट सामन्यांमध्ये रिचर्ड कॅटलब्रो अंपयार असताना टीम इंडियाला पराभवाचे अनेक धक्के बसले.

5/8
रिचर्ड कॅटलब्रो हे 2014 पासून 9 नॉक आऊट सामन्यांमध्ये टीम इंडियाचे अंपायर होते, यातल्या 8 सामन्यांमध्ये टीम इंडियाला पराभवाचा धक्का बसला. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुपर-8 सामन्यातही कॅटलब्रो अंपायर होते, ज्यात टीम इंडियाच पराभव झाला.

6/8
2014 टी-20 वर्ल्ड कप फायनल, 2015 वनडे वर्ल्ड कप सेमी फायनल, 2016 टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनल, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 वनडे वर्ल्ड कप सेमी फायनल या 5 नॉक आऊट सामन्यांमध्ये कॅटलब्रो ऑन फिल्ड अंपायर होते, या सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला.

7/8
2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल, 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि 2023 वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये रिचर्ड कॅटलब्रो थर्ड अंपायर होते, इथेही भारताच्या पदरी निराशा आली.

8/8
आता 2026 च्या टी-20 वर्ल्ड कप फायनलसाठी अंपायरची घोषणा झाली आहे, ज्यात रिचर्ड कॅटलब्रो यांचं नाव नाहीये, त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. रिचर्ड एलिंगवर्थ आणि ऍलेक्स वार्फ हे मैदानातले अंपायर असतील, तर अल्लाहुद्दीन पालेकर थर्ड अंपायर आणि एडरियन होल्डस्टॉक फोर्थ अंपायर असतील. ऍन्डी पायक्रॉफ्ट मॅच रेफ्री आहेत.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement