Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर जेसीबीच्या सावलीखाली जेवायला बसले, ट्रकने दिली जबर धडक, 2 जणांचा मृत्यू
- Published by:Sachin S
Last Updated:
समृद्धी महामार्गावर ४०६ पॉईंटवर सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू होतं. दुपारची वेळ झाल्यामुळे कामगार जेवणासाठी बसले होते. कामगारांनी जेवणासाठी महामार्गावर उभ्या असलेल्या जेसीबीच्या सावलीखाली मागे बसले होते.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ असलेल्या समृद्धी महामार्गावर ४०६ पाँईटवर हा अपघात झाला आहे. सीसीटीव्ही बसवण्यासाठी आलेले कामगार जेवणासाठी महामार्गावर जेसीबीच्या मागे बसले होते, त्यावेळी भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात २ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहे. जखमी कामगारांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरजवळील समृद्धी महामार्गावर दुपारच्या सुमारास ही घटना घडली. समृद्धी महामार्गावर ४०६ पॉईंटवर सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू होतं. दुपारची वेळ झाल्यामुळे कामगार जेवणासाठी बसले होते. कामगारांनी जेवणासाठी महामार्गावर उभ्या असलेल्या जेसीबीच्या मागे बसले होते.
त्यााचवेळी एक भरधाव ट्रक जेसीबीवर येऊन आदळला. हा अपघात इतका भीषण होता की, धडक दिल्यानंतर ट्रकने जेसीबीला काही अंतर फरफटत नेलं. जेवणासाठी बसलेल्या कामगारांना पळ काढण्यासाठी वेळच मिळाला नाही. जेसीबी आणि ट्रकच्या धडकेत साापडून २ कामगारांचा जागेवरच मृत्यू झाला.
advertisement
जेवताना मृत्यू ओढावला
आज सकाळपासून समृद्धी महामार्गावर पाँईंट ४०६ वर सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू होतं. या ठिकाणी एक पूल आहे, पुलाच्या बाजूला हे सीसीटीव्ही लावण्याचं काम सुरू होतं. दुपारची जेवणाची वेळ झाली. समृद्धी महामार्गावर आजूबाजूला अशी फारशी बसायला जागा नव्हती. त्यामुळे कामगारांनी जेसीबी मशीनच्या मागे जेवायला बसू, त्यामुळे दूरवरून येणाऱ्या वाहनांना जेसीबी तरी दिसेल अशी भावना असावी. पण, लोखंडाचे रोल घेऊन जाणाऱ्या भल्या मोठ्या ट्रकने जोरात जेसीबीला धडक दिली. खाली बसलेले कामगार हे जेसीबी आणि ट्रकच्या मध्ये सापडले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि रुग्णावाहिका दाखल झाल्या. जखमी कामगारांना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातामुळे पुन्हा एकदा सुरक्षेचे प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे.
Location :
Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 06, 2026 5:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर जेसीबीच्या सावलीखाली जेवायला बसले, ट्रकने दिली जबर धडक, 2 जणांचा मृत्यू









