advertisement

नेहमीची मिसळ खाऊन कंटाळा आलाय? ट्राय करा कोकण स्पेशल मिसळ, मुंबईत हे लोकेशन

Last Updated:
तुम्हालाही पारंपरिक चवींपलीकडे जाऊन खायची असेल तर तुम्ही कोकण स्पेशल मटकीची मिसळ खाऊ शकता. ही स्पेशल मिसळ मुंबईत मिळत आहे.
1/5
अनेकांना फास्टफूड खायला मोठ्या प्रमाणात आवडतं. फास्टफूडमध्ये अनेक जण मिसळ खाण्याला आवडीने प्राधान्य देतात. मिसळ म्हटली की नागपुरी, कोल्हापुरी किंवा झणझणीत पुणेरी मिसळीचा उल्लेख सर्वात आधी होतो. जर तुम्हालाही पारंपरिक चवींपलीकडे जाऊन खायची असेल तर तुम्ही कोकण स्पेशल मटकीची मिसळ खाऊ शकता. ही स्पेशल मिसळ मुंबईत मिळत आहे.

2/5
सागर आणि काजल यांनी जोगेश्वरी (पूर्व) रेल्वे स्टेशनजवळ सुरू केलेल्या स्टॉलवर ही मिसळ उपलब्ध आहे. या ठिकाणी खाण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी असते. या मिसळमध्ये पारंपरिक वाटाण्याऐवजी येथे मटकीचा वापर केला जातो. त्यामध्ये मटकी उकडून त्यात खोबरं-कांद्याचं वाटप, घरगुती मसाले आणि मालवणी मसाल्यांचा तडका दिला जातो. त्यामुळे ही मिसळ खायला एकदम भारी लागते.

3/5
कोकणातील सागर आणि काजल यांनी जवळपास दहा वर्षे प्रायव्हेट क्षेत्रात नोकरी केली. यावेळी त्यांना नेहमी वाटत असे की स्वतःचा व्यवसाय सुरू असावा आणि त्यातून स्थानिक परंपरा आणि चव पुढे न्यावी, या हेतूने त्यांनी कोकण स्पेशल मिसळ या उपक्रमाची सुरुवात केली.

4/5
तुम्हाला ही कोकणी मिसळ फक्त 50 रुपयांत खायला मिळेल. परवडणारी किंमत आणि वेगळी चव यामुळे मोठी गर्दी येथे असते. स्टॉलचे वेळापत्रक दररोज सकाळी सात ते दुपारी बारा आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ-दहा वाजेपर्यंत असे आहे.

5/5
जोगेश्वरी (पूर्व) रेल्वे स्टेशनजवळ सागर आणि काजल या तरुण दाम्पत्याने सुरू केलेल्या स्टॉलवर ही मिसळ उपलब्ध आहे. सकाळच्या वेळेस नाश्त्यासाठी आणि संध्याकाळच्या वेळेस हलक्याफुलक्या जेवणासाठी या स्टॉलवर चांगलीच गर्दी दिसते.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement