advertisement

Electricity Bill : घरी AC आहे? मग रिमोटवरील हा एक बटण वापरा, वीज बिल होईल थेट अर्ध

Last Updated:
"एसी वापरायचा तर बिल येणारच" असं मानून अनेकजण उकाडा सहन करतात. पण तज्ज्ञांच्या मते, तुमच्या एसी वापरण्याच्या पद्धतीत थोडे 'स्मार्ट' बदल केले, तर तुम्ही थंडगार हवेचा आनंदही घेऊ शकता आणि वीज बिलही निम्म्यावर आणू शकता. कसं? चला जाणून घेऊया एसी वापरण्याच्या या खास ट्रिक्स.
1/8
फेब्रुवारी महिना संपता संपता सूर्याने आपली दाहकता दाखवायला सुरुवात केली आहे. दुपारच्या कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना, घरात आल्यावर आपण सर्वात आधी काय करतो? तर 'एसी'चं बटण ऑन करतो किंवा पंखा लावतो. काही मिनिटांतच मिळणारं ते थंडगार सुख हवंहवंसं वाटतं, पण महिन्याच्या शेवटी जेव्हा हातामध्ये वीज बिल (Electricity Bill) येतं, तेव्हा मात्र अनेकांना घाम फुटतो.

2/8
 "एसी वापरायचा तर बिल येणारच" असं मानून अनेकजण उकाडा सहन करतात. पण तज्ज्ञांच्या मते, तुमच्या एसी वापरण्याच्या पद्धतीत थोडे 'स्मार्ट' बदल केले, तर तुम्ही थंडगार हवेचा आनंदही घेऊ शकता आणि वीज बिलही निम्म्यावर आणू शकता. कसं? चला जाणून घेऊया एसी वापरण्याच्या या खास ट्रिक्स.
"एसी वापरायचा तर बिल येणारच" असं मानून अनेकजण उकाडा सहन करतात. पण तज्ज्ञांच्या मते, तुमच्या एसी वापरण्याच्या पद्धतीत थोडे 'स्मार्ट' बदल केले, तर तुम्ही थंडगार हवेचा आनंदही घेऊ शकता आणि वीज बिलही निम्म्यावर आणू शकता. कसं? चला जाणून घेऊया एसी वापरण्याच्या या खास ट्रिक्स.
advertisement
3/8
'स्मार्ट थर्मोस्टेट' आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरतुमचा साधा एसी आता तुम्ही 'स्मार्ट' बनवू शकता. स्मार्ट थर्मोस्टेट हे उपकरण इंटरनेटला जोडलेले असते, जे तुम्ही मोबाईलवरून कुठेही बसून नियंत्रित करू शकता. यामध्ये 'जिओ-फेन्सिंग' (Geo-fencing) नावाचं अफलातून फीचर असतं. तुम्ही घराबाहेर गेलात की एसी आपोआप बंद होतो आणि घरी येण्यापूर्वी तुम्ही तो ऑन करू शकता. तसेच 'ऑक्यूपेंसी सेन्सर'मुळे खोलीत कोणी नसल्यास कूलिंग आपोआप कमी होते, ज्यामुळे विजेची मोठी बचत होते.

4/8
तापमानाचं योग्य गणित: 24-26 अंशांचा नियमअनेकजण एसी लावल्यावर तो थेट 16 किंवा 18 अंशांवर सेट करतात. यामुळे खोली लवकर थंड होते असा एक समज आहे, पण प्रत्यक्षात कॉम्प्रेसरवर प्रचंड ताण येतो आणि वीज बिल वेगाने वाढते. तज्ज्ञांच्या मते, एसी 24 ते 26 अंश सेल्सिअस दरम्यान चालवणे सर्वात उत्तम आहे. हे तापमान मानवी शरीरासाठी सुखद असते आणि यामुळे विजेचा खर्चही नियंत्रणात राहतो. रात्री झोपताना 'स्लीप मोड'चा वापर करा, ज्यामुळे एसी हळूहळू तापमान शरीराच्या गरजेनुसार वाढवतो.

5/8
घराची 'कॉकपिट' सारखी बांधणी कराएसी सुरू असताना दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवणे ही साधी गोष्ट वाटत असली तरी ती अत्यंत प्रभावी आहे.
जर तुमच्या खिडकीतून थेट ऊन आत येत असेल, तर जाड पडदे लावा. बाहेरून येणारी उष्णता कमी झाली की एसीला कमी काम करावे लागते. दरवाजाच्या खालच्या फटीतून थंड हवा बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. यामुळे खोली जास्त वेळ थंड राहते.
घराची 'कॉकपिट' सारखी बांधणी कराएसी सुरू असताना दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवणे ही साधी गोष्ट वाटत असली तरी ती अत्यंत प्रभावी आहे.जर तुमच्या खिडकीतून थेट ऊन आत येत असेल, तर जाड पडदे लावा. बाहेरून येणारी उष्णता कमी झाली की एसीला कमी काम करावे लागते. दरवाजाच्या खालच्या फटीतून थंड हवा बाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. यामुळे खोली जास्त वेळ थंड राहते.
advertisement
6/8
खोलीच्या आकारानुसार योग्य एसीची निवडतुमच्या खोलीचा आकार किती आहे, यावर एसीची क्षमता (Tonnage) अवलंबून असावी. छोट्या खोलीत 2 टनाचा मोठा एसी लावल्यास विनाकारण वीज वाया जाते. याउलट मोठ्या हॉलमध्ये 1 टनाचा छोटा एसी लावल्यास तो पूर्ण ताकदीने चालूनही खोली थंड होणार नाही आणि बिल मात्र अव्वाच्या सव्वा येईल.

7/8
इको मोड आणि नियमित देखभालतुमच्या रिमोटवर 'Eco Mode' किंवा 'Energy Saver Mode' असेल तर त्याचा वापर नक्की करा. हा मोड विजेचा वापर मर्यादित ठेवतो. यासोबतच एसीचे फिल्टर्स नियमितपणे स्वच्छ करा. घाण साचलेल्या फिल्टर्समुळे एसीला हवा खेचण्यासाठी जास्त ताकद लावावी लागते, ज्यामुळे वीज बिल वाढते.

8/8
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement