बऱ्याचदा पैशाची गरज भासते, त्यावेळी जवळ डेबिट कार्ड नसल्याच्या तुमच्या लक्षात येतं. डेबिट कार्ड नसल्याने एटीएममधून पैसे काढता येणार असा प्रश्न तुमच्यासमोर उभा राहतो. कार्डलेस कॅश विड्रॉवल हा त्यावरचा उपाय आहे. डेबिट कार्ड नसताना देखील एटीएममधून पैसे काढू शकता. जवळ डेबिट कार्ड नसताना यूपीआय एटीएममधून पैसे काढता येतात. (Cardless cash withdrawal from ATMs with UPI)
advertisement
एटीएममधून पैसे काढणे आणि कार्डलेस कॅश या दोन्ही वेगळ्या गोष्टी असून, लोक यावरून गोंधळतात. यूपीआय एटीएम ही अशी सुविधा आहे, ज्याच्या मदतीनं तुम्ही विना डेबिट कार्ड एटीएममधून पैसे काढू शकता. या सुविधेचा वापर करून एटीएममधून पैसे कसे काढायचे, याविषयीची प्रक्रिया समजून घेऊ.
एटीएममधून यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही एका वेळी 10 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढू शकता. ही रक्कम तुमच्या रोजच्या यूपीआय लिमिटचा भाग असेल हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. (Cardless cash withdrawal from ATMs with UPI)
एटीएममधून यूपीआयच्या माध्यमातून रक्कम काढण्यासाठी, तुमचा नंबर यूपीआय रजिस्टर्ड हवा.तरच तुम्ही यूपीआय एटीएमचा वापर करू शकता. रक्कम काढताना एटीएम मशीनमधील यूपीआय कॅश विड्रॉवल/ कार्डलेस कॅश किंवा क्यूआर कॅश या पैकी एका ऑप्शनवर क्लिक करावे. त्यानंतर तुम्ही काढू इच्छित असलेल्या रकमेचा आकडा एटीएम मशीनमध्ये टाकावा.
रकमेचा आकडा टाकल्यावर एटीएम मशीनच्या स्क्रीनवर तुम्हाला सिंगल यूज डायनॅमिक क्यूआर कोड दिसेल. तुम्ही हा कोड कोणत्याही यूपीआय अॅपच्या (फोन पे, गुगल पे, पेटीएम) माध्यमातून स्कॅन करावा. कोड स्कॅन केल्यावर आपला यूपीआय पीन टाकावा. तुम्हाला काही सेकंदात एटीएममधून रोख रक्कम हाती मिळेल. अशा पद्धतीनं तुम्ही जवळ डेबिट कार्ड नसताना देखील एटीएममधून रक्कम काढू शकता.
