रतन टाटांचा जीवनप्रवास
रतन टाटांचा जन्म 28 डिसेंबर 1937
जमशेदजी टाटा यांनी त्यांना दत्तक घेतलं
मुंबईच्या कॅम्पियन शाळेत शिक्षण
1955 मध्ये पदवी प्राप्त केली
1959 मध्ये आर्किटेक्चरमध्ये बॅचलर पदवी
कार्नेल विद्यापीठातून केलं शिक्षण पूर्ण
हार्वर्ड विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवी
1962 मध्ये रतन टाटा समूहात दाखल
advertisement
1971 मध्ये नेल्को कंपनीची धुरा सांभाळली
1981 मध्ये टाटा इंडस्ट्रीची सूत्र सोपवली
1990 ते 2012 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष
ऑक्टो. 2016 ते फेब्रु. 2017 टाटाचे अंतरिम अध्यक्ष
2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस सार्वजनिक केली
2009 मध्ये सामान्यांसाठी नॅनो कारचं लाँचिंग
कोरस, जग्वार, टेटली कंपन्यांची खरेदी
भारत सरकारकडून 'पद्मविभूषण' आणि 'पद्मभूषण' पुरस्कार
'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया आंतरराष्ट्रीय सन्मान'
'ऑर्डर ऑफ ब्रिटिश सन्मान'ही प्राप्त
- 28 डिसेंबर 1937 साली जन्म झालेले रतन टाटा,अविवाहित होते
- रतन टाटा यांचे,3800 कोटींचे,व्यावसायिक साम्राज्य
- आपल्या संपत्तीतील 65 टक्के संपत्ती,रतन टाटा यांनी समाजकार्यासाठी,दान दिली
- या दशकातील सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून,रतन टाटा यांचा आदराने उल्लेख केला जातो
- रतन टाटा यांनी 1961 साली,टाटा समूहात काम सुरू केलं
- टाटा स्टील या कंपनीत शॉप फ्लोअर वर त्यांनी प्रथम काम केलं
वारसदार म्हणून 4 नावं चर्चेत
- रतन टाटा यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि त्यांचे चुलतभाऊ नोएल टाटा
- टाटा गृपमधिल अनेक कंपन्यांतील एक महत्वाचे नाव असलेल्या,34 वर्षीय माया टाटा
- स्टार बाजारचे प्रमुख 32 वर्षीय नेविल टाटा
- इंडीयन हॉटेलचे प्रमुख 39 वर्षीय लीह टाटा
-
रतन टाटा याबाबत काही विशेष
- आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न पुरस्कार प्रदान करून, रतन टाटा यांचा गौरव करावा,या मागणीने मोठा जोर पकडला होता
- हायकोर्टात या मागणीसाठी चक्क याचिकाही दाखल झाली होती
- दिल्ली उच्च न्यायालयाने,ही याचिका दाखल करून घेण्यास,विनम्र नकार दिला होता
- तरीही ही मोहीम जोरात सुरू होती
- मात्र,स्वतः रतन टाटा यांनी पुढाकार घेऊन, हे सर्व थांबवा, अशी जाहीर विनंती केली होती
- 2008 मध्ये रतन टाटा यांचा,आपल्या देशातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान,पद्वविभूषण प्रदान करून गौरविण्यात आलं होतं
- ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया,ऑर्डर ऑफ ब्रिटिश या आंतरराष्ट्रीय सन्मानानही, रतन टाटा यांचा गौरव करण्यात आला होता
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1936 रोजी मुंबईत झाला. टाटा 10 वर्षांचे असताना, 1948 मध्ये त्यांचे आई-वडील विभक्त झाले. त्यानंतर त्यांचे संगोपन त्यांच्या आजीने केले. आजी नवजबाई टाटा यांनीच टाटांना दत्तक घेतले. त्यांचे सुरूवातीचे शिक्षण मुंबईत झाले. पुढे बिशप कॉटन स्कूल, शिमला, नंतर कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस कॉलेजमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. रतन टाटा यांनी अमेरिकेतील दहा वर्षांच्या वास्तव्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये भांडी घासण्यापासून ते लिपिकपदाच्या नोकरीपर्यंत सर्व केले.
रतन टाटा यांची कामाविषयीची प्रामाणिकता आणि धडपड पाहून जेआरडी यांनी रतन टाटांना टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. रतन टाटा यांनी १९६१ मध्ये टाटा स्टीलमधून आपल्या उद्योग जगतातील कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. प्रचंड मेहनताच्या जोरावर टाटांनी समूहाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम काम केले. ज्या सालात टाटांनी समूहाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली तो काळ भारताच्या दृष्टीने अत्यंत खडतर होता. पंतप्रधान व्ही पी सिंह आणि अर्थमंत्री मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात भारताने खासगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यानंतर रतन टाटा यांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. 1990 ते 2012 या काळात त्यांनी समूहाचे अध्यक्षपद भूषवले तसेच ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते.आज घडीला टाटा ग्रुपच्या ८० देशांत १०० कंपन्या आहेत आणि त्यामध्ये सव्वाचार लाख कर्मचारी आहेत.
परोपकार अन् दानधर्मासाठी रतन टाटा यांची विशेष ओळख होती. आपल्या कमाईतला ठराविक वाटा ते दरवर्षी धर्मादाय कार्यात खर्च करत असत. चार वर्षांपूर्वी देशावर कोव्हिडचे संकट आलेले असताना रतन टाटा यांनी पीएम केअर फंडाला १०० कोटी रुपये दिली होती.