TRENDING:

Ladki bahin Yojana: तुमचं E-KYC यशस्वीरित्या पूर्ण झालं की नाही? कुठे आणि कसं चेक करायचं?

Last Updated:

लाडकी बहीण योजनेसाठी E KYC 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. अपूर्ण E KYC असलेल्या महिलांची नावं यादीतून वगळली जातील व पुढील हप्ता मिळणार नाही.

advertisement
लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारी सर्वात महत्त्वपूर्ण योजना आहे. आतापर्यंत ऑक्टोबरचे हप्ते खात्यावर जमा करण्यात आले आहेत. ज्या महिलांनी E KYC केली नाही त्यांना पुढचे हप्ते मिळणार नाहीत. E KYC ची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर असून तूर्तास तरी E KYC साठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असं सांगितलं जात आहे. ज्या महिलांनी E KYC पूर्ण केली नाही त्यांची नावं वगळण्यात येणार आहेत.
News18
News18
advertisement

ज्या महिलांनी E KYC पूर्ण केली आहेत त्यांच नाव यादीत आहे की नाही ते कसं तपासायचं हे सोप्या पद्धतीनं जाणून घेऊया. तुमचे e-KYC यशस्वी झाले आहे की नाही हे तपासण्यासाठी, तुम्ही योजनेच्या अधिकृत पोर्टलवर किंवा तुमच्या जवळच्या 'सेवा केंद्रा'मध्ये तपासणी करू शकता. अधिकृत पोर्टलवर लॉगइन करा. तिथे आधार/ई-केवायसी स्थिती पर्याय निवडा वेबसाइटच्या होमपेजवर तुम्हाला आधार/ई-केवायसी स्टेटस किंवा लाभार्थी स्टेटस चेक असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. e-KYC यशस्वी झाले की नाही, असे तपासा!

advertisement

रजिस्टर नंबर, Application ID अपलोड करावा लागेल. जर तुमच्याकडे हा क्रमांक नसेल, तर तुमचा आधार क्रमांक वापरूनही तुम्ही माहिती तपासू शकता. Captcha Code) भरा सुरक्षेसाठी दिलेला कॅप्चा कोड योग्यरित्या बॉक्समध्ये भरा आणि सर्च बटणावर क्लिक करा. स्टेटस तपासा आणि निश्चित करा स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या अर्जाची आणि e-KYC ची सद्यस्थिती दिसेल. जर e-KYC Status' मध्ये 'यशस्वी Successful किंवा पूर्ण असं लिहिलेलं असेल, तर तुमचे काम पूर्ण झाले आहे आणि तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जर 'e-KYC Status' मध्ये पेंडिंग किंवा अपूर्ण दिसत असेल, तर तुम्हाला त्वरित ते पूर्ण करावे लागेल.

advertisement

जर E KYC पूर्ण झालं नसेल तर न विसरता ते पूर्ण करुन घ्या तुमच्याकडे केवळ 5 दिवस शिल्लक राहिले आहेत. तुमच्या आधार कार्डाचे बायोमेट्रिक म्हणजेच बोटांचे ठसे वापरून e-KYC पूर्ण करा. येथे आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती जुळत असल्याची खात्री करून घ्या. तुमच्या आधार कार्डवर आणि बँक खात्यावर दिलेले नाव, जन्मतारीख आणि पत्ता यात फरक नसावा. फरक असल्यास, तो लगेच दुरुस्त करा.

advertisement

EKYC साठी तुमच्याकडे आता पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. 18 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे, सध्या तरी कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. जर तुम्ही लाडकी बहीणचे E KYC केलं नसेल तर आताच करुन घ्या नाहीतर पुन्हा करण्याची संधी मिळणार नाही. इतकंच नाही तर E KYC न केलेल्यांची नावं यादीतून कायमची वगळण्यात येणार आहेत. त्यांना दीड हजार रुपयांचा हप्ता मिळणार नाही, त्यामुळे तातडीनं

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Ladki bahin Yojana: तुमचं E-KYC यशस्वीरित्या पूर्ण झालं की नाही? कुठे आणि कसं चेक करायचं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल