एकपेक्षा जास्त अकाउंट असतील तर 10 हजार रुपयांचा दंड लागणार असा दावा सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जात आहे. मात्र हा दावा खोटा असल्याचं RBI कडून सांगण्यात आलं आहे. सध्या सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात असा दावा केला जात आहे की, भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) नवीन नियमांनुसार, आता एकापेक्षा जास्त बँकेत खाते ठेवल्यास दंड आकारला जाईल. या बातमीमुळे अनेक लोक गोंधळून गेले आहेत आणि त्यांना चिंता वाटत आहे. या दाव्याची सत्यता तपासण्यासाठी आम्ही 'फॅक्ट चेक' केला आहे.
advertisement
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) निर्देशानुसार एकापेक्षा जास्त बँक खाते असल्यास दंड लागणार, असा दावा करण्यात आला आहे. यात ‘दोन बँक खात ठेवल्यास कठोर दंड आकारला जाईल असंही म्हटलं जात आहे. या दाव्यासोबत RBI चा फोटो जोडण्यात आला आहे. मात्र हा संपूर्ण दावा खोटा आहे, त्यावर कोणताही विश्वास ठेवू नये.
भारत सरकारची अधिकृत फॅक्ट चेक संस्था असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने या दाव्याला पूर्णपणे खोटा ठरवले आहे. पीआयबीने सोशल मीडियावर एक पोस्ट करून स्पष्ट केले आहे की, आरबीआयने एकापेक्षा जास्त बँक खाती ठेवल्याबद्दल दंड आकारण्याबाबत असा कोणताही नियम किंवा मार्गदर्शक सूचना जाहीर केली नाही.
काय आहे नियम
एका बँकेत एकापेक्षा जास्त खाती एका व्यक्तीच्या नावाने उघडता येत नाहीत. मात्र एक व्यक्ती कितीही वेगवेगळ्या बँकांमध्ये खातं उघडू शकते. त्यावर कोणतेही निर्बंध लावण्यात आले नाहीत. मात्र जेवढी बँक खाती आहे तेवढ्या सगळ्यावर मिनिमम बॅलन्सची अट पूर्ण करणं आवश्यक आहे. याशिवाय नेहमी KYC अपडेट ठेवणं गरजेचं आहे. यापैकी कोणत्याही गोष्टी केल्या नसतील तर ते खातं इनअॅक्टिव्ह केलं जाईल. त्यामुळे जेवढे जास्त बँक खाती तेवढा मेन्टेन्स ठेवण्यासाठी लागणारे पैसे जास्त आहेत. मात्र नियम अटी पूर्ण केल्या तर एक व्यक्ती 4-5 बँक खाती सहज उघडू शकतो.