TRENDING:

Farmer Success Story: शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, सुरू केला नर्सरी व्यवसाय, महिन्याला दीड लाख रुपयांची उलाढाल, Video

Last Updated:

या माध्यमातून त्यांची महिन्याला एक ते दीड लाख रुपयांची उलाढाल होत असून ते झाडांची देखभाल करतात, त्यामध्ये कटिंग करणे असे काम चालते.

advertisement
छत्रपती संभाजीनगर : शेंद्रा येथील शेतकरी आणि नर्सरी संचालक भरत मोरे यांनी आठ वर्षांपूर्वी नर्सरी सुरू केली आहे. त्यांच्याकडे फळबाग, शो प्लांट, इंडोर प्लांट यासह विविध प्रकारच्या फुलांची झाडे विक्री करतात. या माध्यमातून त्यांची महिन्याला एक ते दीड लाख रुपयांची उलाढाल होत असून ते झाडांची देखभाल करतात, त्यामध्ये कटिंग करणे असे काम चालते. या दोन्ही कामातून खर्च वजा करून 70 ते 80 हजार रुपयांपर्यंत कमाई होते, असे मोरे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement

जालना रोडवर शेंद्रा येथे मोरे हे विविध प्रकारच्या झाडांची होलसेल विक्री करतात. विशेष म्हणजे ते झाडांच्या वाणाच्या बिया टाकून स्वतः रोप तयार करत असतात. सर्व झाडांची रोपे ते घरी तयार करत असल्यामुळे चांगला फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. फुलांमध्ये मोगरा, जास्वंद, एक्झोरा यासह विविध विदेशी झाडे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत.

advertisement

Farmer Success Story: शेतकऱ्याचा मोसंबी लागवडीचा यशस्वी प्रयोग, मिळणार 5 लाख रुपयांचं उत्पन्न, कशी केली शेती?

नर्सरीच्या माध्यमातून सर्व उलाढाल दीड लाखांची होते. तसेच कामगाराचे पैसे खर्च वजा करून 60 हजार रुपये राहतात तसेच घरगुती झाडांच्या देखभाल करून असे एकूण 70 ते 80 हजार रुपये महिन्याला कमाई होते. सीझनमध्ये 4 ते 5 लाख रुपये मिळत असल्याचे देखील मोरे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांच्या नर्सरीच्या ठिकाणी परिसरातील शेतकरी येत असून त्यांच्याकडून नर्सरी बाबत मार्गदर्शन घेत आहे.

advertisement

नर्सरी व्यवसाय कसा सुरू करावा ?

नर्सरी व्यवसाय सुरू करण्यापूर्वी सर्वांनीच एक महिना नर्सरी पूर्व प्रशिक्षण घ्यावं, त्यामध्ये रोप कशी तयार करायची, झाडांची कटिंग अशा बारीक गोष्टींचा अभ्यास करावा जेणेकरून भविष्यात अडचण निर्माण होणार नाही. नर्सरी सुरू करण्यासाठी देखील अनुभव असणे गरजेचे आहे.

मराठी बातम्या/मनी/
Farmer Success Story: शेतकऱ्याचा प्रयोग भारीच, सुरू केला नर्सरी व्यवसाय, महिन्याला दीड लाख रुपयांची उलाढाल, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल