मंगळवारी सोने जवळपास 5 टक्क्यांनी घसरले असून ऑगस्ट 2020 नंतरची ही सर्वात मोठी एका दिवसातील घसरण आहे. बुधवारी सोन्यातही 1 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. बाजारात नफा-बुकिंग तीव्र होत असताना अमेरिका-चीनमधील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष सोन्याच्या बाजारावरून शेअर बाजाराकडे वळले आहे.दरम्यान सोन्याने अजूनही वर्षभरात जवळजवळ 60% परतावा दिला आहे. या तेजीला प्रामुख्याने फेडरल रिझर्व्हकडून दर कपातीची अपेक्षा आणि भू-राजकीय तणाव यांचा पाठिंबा मिळाला आहे.
advertisement
चांदीच्या दरात जवळजवळ सात टक्के घसरण
केवळ सोनेच नाही तर चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. चांदीच्या दरात जवळजवळ सात टक्के घसरण आहे. ही घसरण महत्त्वाची आहे. कारण सप्टेंबरच्या अखेरीपासून चांदी जवळजवळ 40 टक्क्यांनी वाढली आहे.
सोन्याच्या दरात तब्बल साडेसात हजार रुपयांची घसरण
आज बाजारात मोठी चढ-उताराची स्थिती पाहावयास मिळाली. सकाळपासूनच सोन्याच्या दरात तब्बल साडेसात हजार रुपयांची घसरण झाली आहे. सकाळी दर उच्चांकावर असताना केवळ काही तासांतच दरात पंधराशे रुपयांची घट झाल्याने ग्राहकांनी खरेदीकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली. दिवसभरात दर साडेसात हजारांनी खाली आल्याने सुवर्ण पाडवाच्या मुहूर्तावर खरेदीचा उत्साह अधिकच वाढला.
आजचा सोन्याचा भाव किती? (What is the Price Of Gold)
दिवाळीनंतरच्या या पहिल्याच मोठ्या खरेदीच्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे विक्रीत तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुवर्ण पाडव्यानिमित्त पतीने पत्नीला सोन्याचे दागिने देण्याच्या परंपरेने जळगावमध्ये आज खऱ्या अर्थाने ‘सुवर्ण’ वातावरण निर्माण झाले आहे. आताचा सोन्याचा भाव हा 1लाख 27 हजार इतका आहे.