आकडे काय सांगतात?
सध्या केंद्रीय बँकांच्या एकूण साठ्यात सोन्याचा वाटा सुमारे 20 टक्क्यांवर पोहोचला आहे. युरो मागे सरकून 16 टक्क्यांवर आला आहे. 1996 नंतर पहिल्यांदा सोन्याने अमेरिकन ट्रेझरीलाही मागे टाकलं आहे. डॉलर अजूनही 46 टक्क्यांसह सर्वात मोठा हिस्सा राखतोय, पण 2025 मध्ये त्यात जवळपास 10 टक्क्यांची घट झाली आहे. 2022 पासून दरवर्षी 1,000 टनांहून अधिक सोने केंद्रीय बँकांनी खरेदी केलं आहे. ही मागणी 2020 पूर्वीच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळेच सोन्याची किंमत आकाशाला भिडत आहे. आत्तापर्यंत ती 3,592 डॉलर प्रति औंसवर गेली आहे, जी या वर्षी एकटीच 36 टक्के वाढ दर्शवते.
advertisement
Gold Price Prediction: अमेरिकेचा एक डाव, सोनं गाठणार रेकॉर्डब्रेक द़र, दिवाळीआधीच्या रिपोर्टने वाढलं ग्राहकांचं टेन्शन
गुंतवणूकदारांसाठी संकेत
तज्ज्ञ सांगतात की, सोनं आता फक्त सुरक्षित ठेवा एवढंच राहिलेलं नाही, तर गरजेचं गुंतवणूक साधन बनतंय. गोल्डमन सॅक्सने अंदाज वर्तवला आहे की अमेरिकन ट्रेझरी मार्केटचा केवळ 1 टक्का हिस्सा सोन्यात गेला तरी दर 5,000 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात. भारतात आयसीआयसीआय बँकेने 2026 च्या मध्यापर्यंत सोन्याचा दर 1,25,000 रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला आहे.
अमेरिकेची अडचण वाढतेय
अमेरिकेत नोकरीचे आकडे कमकुवत दिसत आहेत. व्याजदरात कपातीची शक्यता आहे. व्यापारयुद्ध, कर्जवाढ आणि फेडरल रिझर्व्हवर वाढलेला अविश्वास यामुळे डॉलरचे महत्त्व घटत आहे. याच पार्श्वभूमीवर सोन्याची मागणी आणखी वाढेल, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
इंडियन बुलियन असोसिएशननुसार भारतातील सोन्याचे दर 10 ग्रॅम
24 कॅरेट सोन्याचे दर - 112180 रुपये प्रति तोळा
23 कॅरेट सोन्याचे दर - 107496 रुपये प्रति तोळा
22 कॅरेट सोन्याचे दर - 102829 रुपये प्रति तोळा
20 कॅरेट सोन्याचे दर - 93482 रुपये प्रति तोळा
18 कॅरेट सोन्याचे दर - 84135 रुपये प्रति तोळा
14 कॅरेट सोन्याचे दर - 65442 रुपये प्रति तोळा
09 कॅरेट सोन्याचे दर - 42069 रुपये प्रति तोळा