गेल्या एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ९८० रुपयाने घसरला होता तर २२ कॅरेट सोन्याचा दर तब्बल १,१६० रुपयाने कमी झाला होता. घसरणीमागे जागतिक स्तरावरील उलाढाल हे मोठं कारण आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या मागणीत घट होण्यामागे जागतिक कारणं आहेत. अमेरिकेचा डॉलर मजबूत झाल्यामुळे आणि फेडरल रिझर्व्हने वेट अँड वॉच अशी भूमिका घेतल्यामुळे सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाली. त्याचा परिणाम देशांतर्गत दरांवर दिसून येत आहे.
advertisement
देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचे ताजे दर
मुंबई - २२ कॅरेट 111840 रुपये प्रति तोळा २४ कॅरेट 122010 रुपये प्रति तोळा
दिल्ली - २२ कॅरेट 111990 रुपये प्रति तोळा २४ कॅरेट 122160 प्रति तोळा
कोलकाता - २२ कॅरेट 111840 रुपये प्रति तोळा २४ कॅरेट 122010 प्रति तोळा
चेन्नई - २२ कॅरेट 111840 रुपये प्रति तोळा २४ कॅरेट 122010 प्रति तोळा
इंडियन बुलियन असोसिएशनच्या मते मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचे दर 123106 रुपये प्रति तोळा
23 कॅरेट सोन्याचे दर 117980 रुपये प्रति तोळा
22 कॅरेट सोन्याचे दर 112873 रुपये प्रति तोळा
20 कॅरेट सोन्याचे दर 102610 रुपये प्रति तोळा
18 कॅरेट सोन्याचे दर 92354 रुपये प्रति तोळा
14 कॅरेट सोन्याचे दर 71835 रुपये प्रति तोळा
एक ग्रॅम सोन्यासाठी किती मोजावे लागणार
24 कॅरेट सोन्याचे दर 12,201 रुपये प्रति ग्रॅम
22 कॅरेट सोन्याचे दर 11,184 रुपये प्रति ग्रॅम
18 कॅरेट सोन्याचे दर 9,151 रुपये प्रति ग्रॅम
चांदीच्या दरातही मोठी घटसोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही मोठी घट नोंदवण्यात आली आहे. १० नोव्हेंबर रोजी चांदीचा भाव १,५२,४०० रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा हाजिर भाव ४८.४८ डॉलर प्रति औंस इतका आहे.सोन्याची किंमत वाढण्याचा तज्ज्ञांचा अंदाज कायमसोन्याचे दर सध्या कमी झाले असले तरी, आंतरराष्ट्रीय गुंतवणूक बँकांनी सोन्याच्या भविष्यातील दरांबद्दल सकारात्मक अंदाज व्यक्त केला आहे.
तज्ज्ञांच्या मते सोन्या चांदीचे दर कुठे जाणार?
गोल्डमॅन सॅक्स: डिसेंबर २०२६ पर्यंत सोन्याचा भाव $४,९०० प्रति औंस पर्यंत पोहोचू शकतो.
एएनझेड (ANZ): पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत सोने $४,६०० प्रति औंस पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
डीएसपी मेरिल लिंच: सोन्यामधील तेजी अद्याप संपलेली नाही, असे मत.सोन्या-चांदीच्या देशांतर्गत किंमतींवर देशांतर्गत घटकांसह जागतिक घटकांचाही परिणाम होतो. सध्याचा दर कमी झाल्याने गुंतवणूकदारांना खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. असा दावा केला आहे.
