सध्या सोन्याचा दर हा जीएसटी सह एक लाखांच्या वर आहे. तर चांदी एक लाख 8 हजार रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जात आहे. सर्वसामान्य ग्राहकांना सोनं आणि चांदी थेट दुकानात येऊन खरेदी करणे आवक्याबाहेर जात आहे. यामुळेच दुकानात येणारे 40 टक्के ग्राहक हे जुने दागिने मोडून नवे दागिने करण्यास प्राधान्य देत आहे, असं गिरीधरलाल लाधानी सांगतात.
advertisement
Gold Rate: खरंच सोनं स्वस्त होणार की तोळ्याचे दर 1,20,000 रुपयांवर जाणार? तुमच्या प्रश्नांचं उत्तर
विविध जागतिक संस्थांनी सोन्याचे दर हे 3500 अमेरिकी डॉलर्स पर्यंत जातील असं भाकीत वर्तवलं होतं. ते भाकीत खरं ठरलं आहे. जागतिक पातळीवर अशांतता कायम राहिल्यास सोन्याचे दर 4000 अमेरिकी डॉलर्स पर्यंत जाऊ शकतात. तर जगात शांतता निर्माण झाल्यास ते 31 ते 3200 पर्यंत खाली येऊ शकतात. भारतीय रुपयांमध्ये अशांतता कायम राहिल्यास दर एक लाख 25 हजार पर्यंत वाढू शकतात, तर जगात शांतता प्रस्थापित झाल्यास हेच दर 85 ते 90 हजारांच्या दरम्यान राहतील, असंही लाधानी यांनी सांगितलं.
दरम्यान, सध्याच्या काळात सोन्याच्या दरांत झालेली वाढ ही जास्त आहे. यापेक्षा अधिक दरवाढ झाल्यास ग्राहक आणि व्यापारी दोघांसाठीही हानिकारक असल्याचे लाधानी यांनी सांगितलं.