आज सराफा बाजारात चांदीने २ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीच्या किमती एकाच झटक्यात ८७७५ रुपयांनी वाढल्या आणि जीएसटीशिवाय २,००,७५० रुपये प्रति किलोवर उघडल्या. जीएसटीसह चांदी २,०६,७७२ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर आता ९३६ रुपयांनी वाढून १,३२,७१३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. जीएसटीसह तो आता १,३६,६९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.
advertisement
मंगळवारी, चांदी जीएसटीशिवाय १,९१,९७५ रुपये प्रति किलोवर बंद झाली. सोने जीएसटीशिवाय १३१७७७ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले. या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ५६९७३ रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या किमतीत ११४७३३ रुपयांची वाढ झाली आहे.
चांदी तीन लाखांचा टप्पा गाठणार?
व्हेंचुराचे कमोडिटी आणि सीआरएम प्रमुख एन.एस. रामास्वामी यांनी सांगितले की, चांदीच्या पुरवठ्यातील कमतरता आणि मागणीतील बदलत्या प्रोफाइलमुळे किमती लक्षणीयरीत्या वाढू शकतात. चांदी १०० डॉलर प्रति औंस किंवा सुमारे ३ लाख रुपये प्रति किलो इतका दर गाठू शकते. परंतु गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवावे की चांदीतील मजबूत तेजीनंतर अनेकदा तीव्र घसरण होते, असा सल्लाही त्यांनी दिला.
>> कॅरेटनुसार सोन्याच्या किमती
आज, २३ कॅरेट सोन्याचेही ९३३ रुपयांनी वाढून ते प्रति १० ग्रॅम १,३२,१८२ रुपयांवर उघडले. जीएसटीसह त्याची किंमत आता १,३६,१४७ झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
२२ कॅरेट सोन्याची किंमत ८५७ रुपयांनी वाढून १,२१,५६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. जीएसटीसह ती १,२५,२११ रुपये झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत ७०२ रुपयांनी वाढून ९९,५३५ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे आणि जीएसटीसह त्याची किंमत १,०२,५२१ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
१४ कॅरेट सोन्याची किंमत देखील ५४७ रुपयांनी वाढली आहे. आज ते ७७,६३७ रुपयांवर उघडले आणि जीएसटीसह ती ७९,९६६ रुपये झाली आहे.
