आता तुम्ही म्हणाल सिडकोची लॉटरी भरायची म्हणजे डोक्याला कटकट, तर असं अजिबात नाही बरं का? हा तुमचा थोडासा वेळ जातो मात्र तुम्ही जर ही लॉटरी व्यवस्थित भरलीत तर सगळी प्रक्रिया अगदी ऑनलाइन पूर्ण होते. नवी मुंबईसारख्या शहरात सिडकोचं घर मिळणं म्हणजे मोठी लॉटरीच! सिडकोने आता आपली सर्व प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि पारदर्शक केली आहे. पहिल्यांदाच अर्ज करणाऱ्यांना ही प्रोसेस कठीण वाटू शकते, पण खालील काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्ही स्वतः घरबसल्या अर्ज भरू शकता.
advertisement
प्रोफाइल तयार करा
सर्वात आधी सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवर lottery.cidcoindia.com जा. तिथे तुम्हाला तुमचा फोननंबर टाकून Register करावं लागेल. सर्वात महत्त्वाचं तुमचा मोबाईल नंबर आधारसोबत लिंक असणं आवश्यक आहे. अन्यथा ही प्रक्रिया पुढे जाणार नाही. बटणावर क्लिक करून तुमचं युझरनेम आणि पासवर्ड तयार करावा लागेल. तिथे तुमचा मोबाईल नंबर, आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. लक्षात ठेवा, एकदा नोंदणी झाली की त्या माहितीमध्ये बदल करणं कठीण असतं, त्यामुळे माहिती अचूक भरा.
कागदपत्रे अपलोड करा
सिडकोने दिलेल्या माहितीनुसार, प्रोफाईल तयार झाल्यावर तुम्हाला तुमची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड आवश्यक आहे. ते तुम्ही अर्धवट अपलोड करू शकत नाही. आधार कार्ड मागचं पुढचं दोन्ही असायला हवं. पॅनकार्ड देखील व्यवस्थित अपलोड करायला हवं. तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न किती आहे, त्यावरून तुमची कॅटेगरी (EWS किंवा LIG) ठरते. रहिवासी दाखला महाराष्ट्र राज्याचा १५ वर्षांचा रहिवासी दाखला असणं बंधनकारक आहे. रद्द केलेला चेक किंवा पासबुकची प्रत, जेणेकरून लॉटरी लागली नाही तर तुमचे पैसे याच खात्यात परत येतील.
घराची निवड आणि अर्ज
कागदपत्रे व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला सध्या सुरू असलेल्यालाईव्ह स्कीम दिसतील. तुम्हाला ज्या भागात घर हवं आहे (उदा. तळोजा, द्रोणागिरी किंवा खारघर) त्या भागातील घरांची निवड करा. तुमची जात किंवा आरक्षण प्रवर्ग असल्यास त्याचा पर्याय नीट निवडा. तुम्हाला तिथे तीन प्रेफरन्स निवडायचे आहेत. पहिल्या प्रेफरन्समध्ये पाच प्रकल्प निवडता येणार आहेत. तुम्ही एकाच प्रोजेक्टमधील वेगवेगळ्या इमारती देखील निवडू शकता.
अनामत रक्कम भरणे
अर्ज पूर्ण भरून झाल्यावर तुम्हाला 'अर्न्वेस्ट मनी डिपॉझिट म्हणजेच अनामत रक्कम भरावी लागते. ही रक्कम घराच्या किमतीवर अवलंबून असते. नेट बँकिंग किंवा क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे तुम्ही हे पैसे भरू शकता. अर्जाची पावती आणि पेमेंट सक्सेसफुल झाल्याचा मेसेज जपून ठेवा.
लॉटरीचा निकाल आणि परतावा
ठरलेल्या तारखेला संगणकीय पद्धतीने लॉटरी काढली जाते. जर तुमचं नाव लॉटरीमध्ये आलं नाही, तर तुमची अनामत रक्कम काही दिवसातच तुमच्या बँक खात्यात पुन्हा जमा केली जाते. त्याआधी तुम्हाला २३६ रुपये रक्कम ही तुम्हाला रजिस्ट्रेशन फी भरावी लागणार आहे.
