TRENDING:

365 दिवसात किती सोने आयात झाले? ना UAE, ना साऊथ आफ्रिका मग कोणत्या देशातून भारतात येते सर्वाधिक गोल्ड

Last Updated:

Gold Silver Imports: भारतामध्ये सोने आणि चांदीच्या आयातीत मोठी वाढ झाल्याने व्यापार तुटीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

advertisement
नवी दिल्ली: सोने आणि चांदीबाबत सरकारने महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या माहितीनुसार एप्रिल ते फेब्रुवारी 2025-26 या कालावधीत भारतातील सोने आयात 28.73 टक्क्यांनी वाढून 69 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.
News18
News18
advertisement

आयात वाढल्याने व्यापार तुटीत वाढ

मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत सोने आयात 53.52 अब्ज डॉलर्स इतकी होती. मात्र यंदा सोने आयात वाढल्यामुळे देशाचा व्यापार तुटीचा आकडा देखील वाढून 310.60 अब्ज डॉलर्स झाला आहे. जो मागील वर्षी याच कालावधीत 261.80 अब्ज डॉलर्स होता.

सोन्याचे दर आणि आयात करणारे प्रमुख देश

सध्या राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा दर सुमारे 1,51,500 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. भारतात होणाऱ्या सोने आयातीत स्वित्झर्लंडचा सुमारे 40 टक्के वाटा आहे, तर संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) 16 टक्क्यांहून अधिक आणि दक्षिण आफ्रिकेचा सुमारे 10 टक्के वाटा आहे. देशाच्या एकूण आयातीत या मौल्यवान धातूचा वाटा 5 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.

advertisement

जगातील दुसरा सर्वात मोठा ग्राहक

स्वित्झर्लंडकडून भारताची आयात 11.57 टक्क्यांनी वाढून 23.5 अब्ज डॉलर्स झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात या देशातून होणारी सोने आयात वर्षाच्या तुलनेत तब्बल 719.30 टक्क्यांनी वाढून 2.71 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोने ग्राहक देश आहे. भारतात सोने आयात प्रामुख्याने दागिने उद्योगातील मागणी पूर्ण करण्यासाठी केली जाते.

advertisement

चालू खाते तुटीवर परिणाम

सोने आयातीचा परिणाम देशाच्या चालू खाते तुटीवरही झाला आहे. RBI च्या माहितीनुसार डिसेंबर तिमाहीत चालू खाते तुटीचा आकडा 13.2 अब्ज डॉलर्स (GDP च्या 1.3 टक्के) इतका होता. जो मागील वर्षी 11.3 अब्ज डॉलर्स होता. मात्र एप्रिल-डिसेंबर 2025 दरम्यान चालू खाते तुटीचा आकडा कमी होऊन 30.1 अब्ज डॉलर्स (GDP च्या 1 टक्का) झाला. जो मागील वर्षी 36.6 अब्ज डॉलर्स होता.

advertisement

चांदी आयातीत मोठी वाढ

याच कालावधीत चांदीची आयात 142.87 टक्क्यांनी वाढून 11.43 अब्ज डॉलर्स झाली आहे. चांदीचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल आणि फार्मा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जातो.

सरकारची पावले

आयात कमी करण्यासाठी सरकारने अलीकडेच सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या विविध वस्तूंवर आयात निर्बंध लावले आहेत. यामुळे आयात नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
365 दिवसात किती सोने आयात झाले? ना UAE, ना साऊथ आफ्रिका मग कोणत्या देशातून भारतात येते सर्वाधिक गोल्ड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल