काय आहे 'कवच' तंत्रज्ञान?
'कवच' हे पूर्णपणे भारतात विकसित केलेले (स्वदेशी) 'ट्रेन कोलिजन अॅव्हॉइडन्स सिस्टम' (TCAS) आहे. हे तंत्रज्ञान प्रामुख्याने खालील गोष्टींसाठी काम करते.
आमनेसामने टक्कर रोखणे: जर एकाच ट्रॅकवर दोन गाड्या समोरासमोर आल्या तर 'कवच' आपोआप ब्रेक लावून अपघात रोखते.
ऑटोमॅटिक ब्रेकिंग: लोको पायलटच्या हातून काही चूक झाली किंवा सिग्नल ओलांडला गेला तर ही यंत्रणा सक्रिय होऊन गाडीचा वेग नियंत्रित करते.
advertisement
धुक्यात उपयुक्त: खराब हवामान किंवा दाट धुक्यातही रेल्वे चालवताना हे तंत्रज्ञान मार्गदर्शक ठरते.
सिग्नलिंग यंत्रणेचा कायापालट
केवळ 'कवच' नव्हे, तर रेल्वेच्या जुन्या सिग्नलिंग यंत्रणेचेही आधुनिकीकरण केले जाणार आहे. या सुधारणेमुळे रेल्वे नेटवर्कची कार्यक्षमता (Efficiency) वाढणार आहे. गाड्यांचे वेळापत्रक अचूक पाळणे आणि गाड्यांमधील सुरक्षित अंतर राखणे यामुळे अधिक सोपे होईल. डिजिटल सिग्नलिंगमुळे मानवी चुकांची शक्यता कमी होऊन रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान आणि 'स्मूथ' होणार आहे.
प्रवासी सुरक्षा आणि रेल्वेचे उद्दिष्ट
रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते भारतातील वाढती प्रवासी संख्या आणि धावणाऱ्या गाड्यांचे जाळे पाहता तांत्रिक अपग्रेडेशन काळाची गरज आहे. या गुंतवणुकीमुळे भविष्यातील मोठ्या अपघातांची शक्यता कमी होईल आणि प्रवाशांचा रेल्वेवरील विश्वास वाढेल. भारतीय रेल्वे आता ग्लोबल स्टँडर्ड्स गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून 'कवच' सारखी यंत्रणा त्यात कणा ठरणार आहे.
रेल्वे स्टॉक्सवर काय परिणाम?
रेल्वेने एवढ्या मोठ्या निधीची तरतूद केल्यामुळे रेल्वे क्षेत्राशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये (Railway Stocks) तेजी येण्याची शक्यता आहे. सिग्नलिंग आणि सुरक्षा उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना यामुळे मोठ्या ऑर्डर मिळण्याची चिन्हे आहेत.
Disclaimer: वरील माहिती तज्ञांनी व्यक्त केलेले विचार आणि गुंतवणूक टिप्स त्यांचे स्वतःचे आहेत. वेबसाइट किंवा तिच्या व्यवस्थापनाचे नाहीत. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
