यूएस फेडरल रिझर्व्हच्या महत्त्वाच्या बैठकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. याच कारणामुळे आज भारतीय कमोडिटी एक्सचेंज वरही सोन्या-चांदीच्या किंमती वाढलेल्या दिसत आहेत. एमसीएक्सवर सोने 401 रुपयांनी म्हणजेच 0.34 टक्क्यांनी वाढून 1,20,047 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचले आहे. तर चांदीच्या दरांमध्येही मोठी तेजी दिसत आहे. चांदी ९८९ रुपयांनी म्हणजेच ०.६९ टक्क्यांनी वाढून १,४५,३३१ रुपये प्रति किलो दराने ट्रेड करत आहे.
advertisement
सोने महागण्याचे मुख्य कारण काय?
सोन्याच्या दरातील या वाढीमागे मुख्य कारण म्हणजे यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची वाढती शक्यता आहे. जेव्हा फेड बँक व्याजदर कमी करते, तेव्हा सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे लोकांचा ओढा वाढतो, ज्यामुळे सोन्याचे भाव वाढतात. मात्र, अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरातील वाढ काही प्रमाणात नियंत्रित राहिली आहे. जागतिक बाजारातसोन्याचा हाजिर भाव ०.२ टक्क्यांनी वाढून $३,९५७.४२ प्रति औंस वर आहे. (डिसेंबर डिलिव्हरी असलेला यूएस गोल्ड फ्युचर्स मात्र ०.३ टक्क्यांनी घसरून $३,९७१.२० प्रति औंसवर आहे.
भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम
रॉयटर्सच्या अहवालानुसार, सोन्याच्या दराला अनेक घटकांचा मोठा आधार मिळत आहे. भू-राजकीय अनिश्चितता: मध्यपूर्वेत (Middle East) भू-राजकीय तणाव वाढल्यामुळे सोने महागले आहे. इस्रायलने हमासवर युद्धविराम मोडल्याचा आरोप केल्यानंतर गाझामध्ये पुन्हा हल्ले सुरू केले आहेत. अशा युद्धजन्य किंवा अस्थिर परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडे वळतात.
जगभरातील मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत, ज्यामुळे सोन्याच्या दराला आधार मिळत आहे. या वर्षी सोन्याच्या दरात आतापर्यंत सुमारे ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २० ऑक्टोबर रोजी सोन्याने $४,३८१.२१ चा विक्रमी उच्चांक गाठला होता.
Kedia Commodity चे तज्ज्ञ अजय केडिया यांनी आज गोल्ड, सिल्वर आणि कच्च्या तेलामध्ये कमाईसाठी काही महत्त्वाचे ट्रेडिंग कॉल दिले आहेत, ज्याच्या मदतीने गुंतवणूकदार नफा कमावू शकतात. कमोडिटीगुंतवणूक सल्लास्टॉपलॉस टार्गेट MCX गोल्ड ११९६०० रुपयांच्या आसपास खरेदी करा आणि ११९००० किंवा १२०६०० रुपयांवर गेल्यावर विकता येईल. MCX सिल्वर १४४२०० च्या आसपास खरेदी करा १४३२०० रुपये किंवा १४६००० रुपयांच्या आसपास विक्री करा. MCX क्रूड तेल ५३५० रुपयांच्या आसपास विक्री करा ५४२० किंवा ५२६० विक्री करा.
