TRENDING:

आठवडाभरात कमी झाला सोन्याचा भाव! चांदी सुसाट, लगेच चेक करा भाव 

Last Updated:

Gold Price This Week: या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार झाले. आयबीजेएच्या दरांनुसार, सोने प्रति 10 ग्रॅम ₹307 ने घसरले, तर चांदी प्रति किलो 4,094 ने वाढली.

advertisement
Gold Price This Week: या आठवड्यात (27-31 ऑक्टोबर), सोने आणि चांदीच्या किमतीत चढ-उतार झाले. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) नुसार, गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅम ₹307 ने घसरल्या, तर चांदीच्या किमती प्रति किलो 4,094 ने वाढल्या.
गोल्ड अँड सिल्व्हर रेट
गोल्ड अँड सिल्व्हर रेट
advertisement

27 ऑक्टोबर रोजी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम ₹1,21,077 होती. जी आठवड्याच्या मध्यात घसरून ₹1,18,043 वर आली. 31 ऑक्टोबर रोजी सोने प्रति 10 ग्रॅम ₹1,20,770 वर पोहोचले. तसंच, चांदीचा भाव वेगळा होता. 27 ऑक्टोबर रोजी चांदी प्रति किलो ₹1,45,031 वर उघडली आणि 31 ऑक्टोबर रोजी प्रति किलो ₹1,49,125 वर बंद झाली.

advertisement

IBJA चे दर देशभर स्वीकारले जातात

IBJA ने जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या स्टँडर्ड किमती दर्शवतात. या किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. IBJA ने जाहीर केलेले दर देशभर स्वीकारले जातात, परंतु त्यात GST समाविष्ट नाही.

काय सांगता! सेव्हिंग्स अकाउंटमध्येही मिळेल FD सारखा नफा, पण कसा?

गेल्या आठवड्यात सोन्याचा दर किती बदलला आहे?

advertisement

27 ऑक्टोबर 20252025 – प्रति 10 ग्रॅम ₹1,21,077

28 ऑक्टोबर 2025 – प्रति 10 ग्रॅम ₹1,18,043

29 ऑक्टोबर 2025 – प्रति 10 ग्रॅम ₹1,20,628

30 ऑक्टोबर 2025 – प्रति 10 ग्रॅम ₹1,19,619

31 ऑक्टोबर 2025 – प्रति 10 ग्रॅम ₹1,20,770

गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला आहे?

27 ऑक्टोबर 2025 – ₹1,45,031 प्रति किलोग्राम

advertisement

28 ऑक्टोबर 2025 – ₹1,41,896 प्रति किलोग्राम

29 अक्टूबर, 2025 –  ₹1,46,633 रुपये प्रति किलोग्राम

30 ऑक्टोबर 2025 – ₹1,46,783 प्रति किलो

31 ऑक्टोबर, 2025 –  1,49,125 रुपये प्रति किलोग्राम

ATM मधून फक्त पैसे नाही, ही 7 कामही करता येतात, बँकेत जाण्याची ही गरज नाही, तुम्हाला हे माहितीय का?

advertisement

तुमच्या मोबाईल फोनवर पाहा गोल्ड रेट 

हे लक्षात ठेवावे की, IBJA शनिवार आणि रविवारी सरकारी सुट्टी वगळता दर जाहीर करत नाही. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर सोन्याची किरकोळ किंमत देखील तपासू शकता. फक्त 8955664433 वर मिस्ड कॉल द्या आणि तुम्हाला एक मेसेज मिळेल. सोन्याच्या किंमतीची माहिती तुम्हाला एसएमएसद्वारे पाठवली जाते.

मराठी बातम्या/मनी/
आठवडाभरात कमी झाला सोन्याचा भाव! चांदी सुसाट, लगेच चेक करा भाव 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल