मेस्सीच्या जादुई डाव्या पायावर ७४ अब्ज रुपयांचे कवच
न्यूज 18ने दिलेल्या वृत्तानुसार, लिओनेल मेस्सीचं नाव घेतलं की, त्याचं अनोखं कौशल्य, अप्रतिम तंत्रज्ञान आणि मैदानावरील 'जादू' आठवते. मेस्सीचा डावा पाय हा केवळ एक अवयव नाही, तर फुटबॉल विश्वातील सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली हत्यार म्हणून ओळख आहे. फ्री किक, ड्रिब्लिंग असो किंवा अत्यंत महत्त्वाच्या क्षणी केलेला निर्णायक गोल असो, मेसीचा डावा पाय नेहमीच चमत्कार घडवून आणतो. याच कारणामुळे मेस्सीने आपल्या या जादुई डाव्या पायाचा जवळपास ७४ अब्ज रुपयांचा विमा उतरवला आहे. या प्रचंड रकमेमुळे मेस्सी जगातील सर्वात महागड्या 'बॉडी पार्ट'चा विमा उतरवणारा खेळाडू ठरला आहे.
advertisement
रोनाल्डोचे पॉवर प्ले ११ अब्ज रुपयांचा ब्रँड
मेस्सीचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा खेळ पॉवर, स्पीड, हेडिंग आणि परफेक्ट फिटनेससाठी जगभर ओळखला जातो. २००९ मध्ये रोनाल्डो जेव्हा रियल माद्रिद क्लबमध्ये सामील झाला, तेव्हा क्लबने त्यांच्या पायांसाठी सुमारे ११ अब्ज रुपयांचा विमा काढला होता. हा विमा स्पष्ट करतो की रोनाल्डोचे पाय केवळ मजबूत स्नायू नसून, ते स्वतःमध्ये एक चालता-फिरता ब्रँड आहेत, ज्याची किंमत अब्जावधींमध्ये आहे.
बेकहमची स्टाईल आणि बेलचा वेग
फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात स्टायलिश खेळाडू म्हणून डेव्हिड बेकहमचे नाव घेतले जाते. त्यांची फ्री किक आजही इतिहासातील सर्वात सुंदर किक्सपैकी एक मानली जाते। २००६ मध्ये बेकहमने आपल्या दोन्ही पायांचा सुमारे १६ अब्ज रुपयांचा विमा उतरवला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा विमा अपग्रेड करून घेतला। या यादीत गॅरेथ बेलचा सुद्धा समावेश आहे. लांबून मारलेले लॉन्ग शॉट, जबरदस्त वेग आणि मोठ्या सामन्यांमध्ये गोल करण्याची क्षमता यामुळे बेलच्या पायांची किंमतही कमी नाही, त्यांचा विमा सुमारे ७ अब्ज रुपयांचा आहे.
