TRENDING:

Ladki bahin Yojana: आज खात्यात पैसे आले, पण पुढच्या महिन्यात येणार नाहीत! तातडीने हे काम करा, अन्यथा यादीतून नाव बाद

Last Updated:

Ladki bahin Yojana: या नियमांनुसार, योजनेच्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

advertisement
मुंबई: लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या लाभार्थी असाल तर तुम्हाला आताच ही बातमी वाचणं गरजेचं आहे. आज तुमच्या बँक खात्यात लाडकी बहीणचा निधी जमा झाल्याचा मेसेज आला असेल. हा क्षणिक आनंद साजरा करत असाल, तर लगेच थांबा! कारण, हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमचा शेवटचा सन्मान निधी ठरू शकतो.
लाडकी बहीण योजना
लाडकी बहीण योजना
advertisement

E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक

कोट्यवधी महिलांसाठी ही आनंदाची आणि तितकीच गंभीर धोक्याची घंटा आहे. जर तुम्ही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी एक अत्यंत महत्त्वाचे 'सरकारी काम' पूर्ण केले नाही, तर तुमचा पुढचा हप्ता कायमचा थांबणार आहे आणि तुमचे नाव यादीतून बाद होण्याची भीती आहे! योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी सरकारने आता E-KYC प्रक्रिया बंधनकारक केली असून, यासाठी अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थींना त्यांचा सन्मान निधी आधार संलग्नित बँक खात्यात पाठवला जात आहे, आता प्रशासनाने कठोर नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार, योजनेच्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

advertisement

E-KYC का आहे इतके महत्त्वाचे?

हा सन्मान निधी तुमच्यापर्यंत कोणताही अडथळा न येता, थेट आणि पारदर्शकपणे पोहोचावा यासाठी E-KYC प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ही पडताळणी प्रक्रिया न केल्यास, तुमची पात्रता अपूर्ण मानली जाईल. तुम्ही जर आता ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर याचा अर्थ शासन तुमच्या पात्रतेबद्दल खात्री देऊ शकत नाही. परिणामी, योजनेच्या नियमांनुसार तुमचे नाव अपात्र ठरवले जाईल आणि पुढील महिन्याच्या निधी वितरणाच्या वेळी तुमचा समावेश केला जाणार नाही.

advertisement

हातात केवळ काही दिवस शिल्लक!

तुम्हाला आठवण करून देण्यासाठी हे जाणून घ्या, की E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ आहे! ऑक्टोबर महिन्याचा निधी मिळाल्याच्या आनंदात राहू नका, कारण त्यानंतर लगेचच अवघे काही दिवस E-KYC साठी उरले आहेत. ज्या महिलांनी मागील महिन्यात या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले, त्यांना आता त्वरित पाऊल उचलणे आवश्यक आहे. ही अंतिम मुदत असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असे स्पष्ट संकेत शासनाने दिले आहेत.

advertisement

E-KYC प्रक्रिया अशी करा पूर्ण

ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप E-KYC केलेले नाही, त्यांनी आता एका क्षणाचीही वाट पाहू नये. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, जी अत्यंत सोपी आहे. या योजनेचा लाभ दर महिन्याला नियमितपणे आणि अखंडित मिळावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी १८ नोव्हेंबरपूर्वी तातडीने E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असे नम्र आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. या शेवटच्या संधीचा फायदा घ्या आणि तुमचा हक्काचा सन्मान निधी सुरक्षित करा!

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Ladki bahin Yojana: आज खात्यात पैसे आले, पण पुढच्या महिन्यात येणार नाहीत! तातडीने हे काम करा, अन्यथा यादीतून नाव बाद
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल