मोमोज लोकप्रिय झाल्यानंतर नितीनने इटालियन फूडही सुरू करण्याचा निर्णय घेतला. पास्ता, मेगी, गार्लिक ब्रेड, टाको असे अनेक पदार्थ त्याने मेनूमध्ये आणले. इथेही लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास आणखी वाढला आणि त्याने दुसरं आउटलेट म्हणून पुस्तक कॅफे सुरू केलं. या कॅफेमध्ये जवळपास 4 हजार पुस्तके आहेत जिथे लोक खाऊन-पिऊन आरामात वाचू शकतात.
advertisement
Success Story : शेतकरी नव्हे CA वाल्या ताईंची कमाल, मराठवाड्यात यशस्वी केली केशरची शेती!
तरीही सुरुवातीला कॅफेला फारसे ग्राहक मिळत नव्हते. खर्च वाढत होता आणि कॅफे बंद करावा लागेल का अशी वेळ नितीनवर आली होती. पण त्याने हार न मानता योग्य मार्केटिंग सुरू केलं. सोशल मीडिया पोस्ट्स, रील्स, ऑफर्स, कॅफेचं आकर्षक वातावरण सगळ्यावर मेहनत घेतली. हळूहळू लोक कॅफेकडे आकर्षित होऊ लागले आणि आज त्या कॅफेला उत्तम प्रतिसाद मिळतो. आज नितीन महिन्याला 2 ते 3 लाख रुपये सहज कमावतो.
कुठलीही गोष्ट सुरू करायची असेल तर प्लानिंग करा आणि योग्य मार्केटिंग करा. यश नक्की मिळेल. नोकरी सुरक्षित असली तरी त्यात स्वातंत्र्य कमी असतं, पण व्यवसायात स्वातंत्र्यही आहे आणि वाढीची संधीही अमर्याद आहे. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी व्यवसाय जरूर करा, असं नितीन नाईने सांगितले.
नितीनची कथा आजच्या तरुणांना सांगते, धैर्य, मेहनत आणि योग्य दिशा मिळाली तर छोटा स्टॉलही मोठ्या व्यवसायात बदलू शकतो.