ही कहाणी सुरू होते एका अपघाताने, ज्यामध्ये एका वृद्ध महिलेचं निधन झाले. आईच्या निधनानंतर त्यांच्या मुलाने आईच्या दागिन्यांचा खूप शोध घेतला, परंतु ते कुठेच सापडले नाहीत. अखेर ते दागिने चोरीला गेले असावेत किंवा हरवले असावेत असे समजून तो मुलगा शांत बसला. काही वर्षांनंतर घर बदलताना त्यांनी घरातील एक जुनं लोखंडाचं कपाट त्यांनी आपल्या शेजाऱ्याला मोफत देऊन टाकलं.
advertisement
त्या शेजारी कुटुंबानेही ती कपाट आनंदाने स्वीकारला आणि तब्बल 9 वर्षे त वापरत होते. पण त्या कपाटाची रचना काहीशी वेगळी होती; त्याचा एक कोपरा सहजासहजी दिसत नव्हता, ज्याला आपण चोर कप्पा देखील म्हणतो. एके दिवशी साफसफाई करताना घराच्या मालकाला कपाटाच्या एका कोपऱ्यात काहीतरी चमकताना दिसलं. कुतूहलापोटी त्यांनी तिथे नीट तपासणी केली आणि त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तिथे आईचे हरवलेले दागिने जसेच्या तसे सुरक्षित होते.
त्या कपाटाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात तब्बल 7 तोळे सोन्याचे दागिने होते, ज्यामध्ये सुंदर हार, बांगड्या, झुमके आणि मोत्यांचा समावेश होता. इतकंच नाही तर तिथे 7,000 रुपयांची रोख रक्कमही होती (जी जुन्या चलनी नोटांच्या स्वरूपातील होती). सोन्याचे आजचे भाव पाहता ही रक्कम त्या गरीब कुटुंबाचे नशीब बदलण्यासाठी पुरेशी होती. मात्र, त्यांनी क्षणाचाही विचार न करता मूळ मालकाला फोन लावला आणि "तुमची ठेव माझ्याकडे सुरक्षित आहे," असा निरोप दिला.
ही थक्क करणारी घटना केरळमधील कट्टप्पना वेल्लायमकुडी येथे घडली आहे. येथील रहिवासी मारोटिसरिल बाबू यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ते ज्या कपाटाबद्दल बोलत होते, तो कपाट त्यांचे शेजारी आणि शिक्षक कैनिकुनेल जीजो यांच्या आईचं होतं. जीजो यांच्या आईचा 11 वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून हे दागिने बेपत्ता होते.
ईस्टरच्या शुभ मुहूर्तावर, नगरसेवक बीना सिबी यांच्या उपस्थितीत बाबू यांनी हे सर्व दागिने जीजो यांच्या स्वाधीन केले. बाबू यांचे स्वतःचे घर आर्थिक अडचणींमुळे विकले गेले असून ते सध्या भाड्याने राहत आहेत, तरीही त्यांनी आपल्या शेजाऱ्याचा हक्क त्यांना परत मिळवून दिला.
