मुंबई: भारतीय शेअर बाजारात दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या शुभ प्रसंगी मुहूर्त ट्रेडिंग हा विशेष सेशन आयोजित केला जाणार आहे. 21 ऑक्टोबर 2025 रोजी गुंतवणूकदारांसाठी हे सत्र सुरू होईल. या पारंपरिक आणि शुभ मानल्या जाणाऱ्या सत्रात गुंतवणूक केल्याने समृद्धी आणि यश लाभते, असा विश्वास गुंतवणूकदारांमध्ये आहे.
advertisement
मुहूर्त ट्रेडिंग सत्राचा वेळ
तारीख: 21 ऑक्टोबर 2025 (दिवाळी)
वेळ: दुपारी 1:45 ते 2:45 – NSE आणि BSE वर एक तासाचे विशेष ट्रेडिंग सत्र
प्री-ओपन सत्र: दुपारी 1:30 ते 1:45 – ट्रेडर्सना व्यवहारासाठी तयारी करण्यासाठी
हे विशेष सत्र दरवर्षी दिवाळीच्या दिवशी "शुभारंभ" आणि "माता लक्ष्मीची कृपा" मिळवण्यासाठी ठेवले जाते. गुंतवणूकदारांसाठी हा दिवस नवीन संवत्सराची (आर्थिक वर्षाची) सुरुवात मानला जातो.
परंपरा आणि महत्त्व
-मुहूर्त ट्रेडिंग ही परंपरा भारतीय शेअर बाजारात अनेक दशकांपासून सुरू आहे. गुंतवणूकदार या दिवशी केलेली गुंतवणूक ही समृद्धी, वाढ आणि आर्थिक यश घेऊन येते असा विश्वास बाळगतात.
-रिटेल गुंतवणूकदार असोत किंवा मोठ्या वित्तीय संस्था, सर्वजण या दिवशी काही ना काही गुंतवणूक नक्कीच करतात.
-काहीजण वर्षभर व्यवहार करत नसले तरी या दिवशी शुभतेसाठी थोडीफार खरेदी करतात.
-इतर दिवसांच्या तुलनेत या दिवशी व्यवहाराचे प्रमाण कमी असले तरी बाजारातील वातावरण अत्यंत सकारात्मक आणि उत्साहवर्धक असते.
मागील 10 वर्षांतील निफ्टीचा परफॉर्मन्स
गेल्या दशकभरात, बेंचमार्क निर्देशांक Nifty 50 ने मुहूर्त ट्रेडिंगच्या सत्रात 10 पैकी 8 वेळा वाढ दाखवली आहे आणि फक्त 2 वेळा तो निगेटिव्ह झाला आहे.
वर्ष | निफ्टी वाढ/घट (%) |
---|---|
2024 | 0.40% |
2023 | 0.51% |
2022 | 0.87% |
2021 | 0.49% |
2020 | 0.47% |
2019 | 0.37% |
2018 | 0.65% |
2017 | −0.63% |
2016 | −0.14% |
2015 | 0.54% |
2024 मध्ये मुहूर्त ट्रेडिंग सत्रात निफ्टी 99 अंकांनी वाढून 24,304.35 वर बंद झाला होता.
सेंसेक्सचा परफॉर्मन्स
सेंसेक्सने देखील गेल्या 10 वर्षांमध्ये फक्त 2016 आणि 2017 मध्ये निगेटिव्ह बंद झाला होता. 2017 नंतर तो दरवर्षी हिरव्या झोनमध्येच राहिला आहे. 2022 मध्ये सेंसेक्सने सर्वात चांगली कामगिरी केली होती.
वर्ष | सेंसेक्स वाढ/घट (%) |
---|---|
2024 | 0.42% |
2023 | 0.55% |
2022 | 0.88% |
2021 | 0.49% |
2020 | 0.45% |
2019 | 0.49% |
2018 | 0.70% |
2017 | −0.60% |
2016 | −0.04% |
2015 | 0.48% |
मुहूर्त ट्रेडिंगची खासियत
-या दिवशी अनेक गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओला शुभ सुरुवात देण्यासाठी छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात.
-“धन वर्षाव” आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी हा दिवस शुभ मुहूर्त मानला जातो.
-ऐतिहासिक आकडेवारी दर्शवते की मुहूर्त ट्रेडिंगच्या सत्राने बहुतांश वेळा पॉझिटिव्ह रिटर्न्स दिले आहेत.