TRENDING:

अवघे काही तास शिल्लक, ३१ डिसेंबरनंतर खिशातलं कार्ड ठरेल फक्त प्लास्टिकचा तुकडा; अन्यथा आजच करा हे काम

Last Updated:

३१ डिसेंबर २०२५ ही पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. लिंक न केल्यास पॅन डिअॅक्टिव्हेट होईल, आर्थिक व्यवहार, KYC, गुंतवणूक आणि लोन अडचणीत येतील.

advertisement
घड्याळाचे काटे वेगाने फिरत आहेत आणि त्यासोबतच तुमच्या पॅन कार्डची मुदतही संपत चालली आहे. जर तुम्ही अजूनही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नसेल, तर ३१ डिसेंबर २०२५ ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. तुमच्याकडे अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. सरकारने स्पष्ट केलंय की, ही शेवटची संधी आहे. यानंतर तुमचं पॅन कार्ड डिअॅक्टिव्हेट होईल, म्हणजेच ते कचऱ्यात टाकायच्या लायकीचं होईल.
News18
News18
advertisement

नेमकं नुकसान काय होणार?

पॅन कार्ड बंद पडलं की फक्त सरकारी कामं अडकतील असं समजू नका. याचे चटके तुमच्या खिशालाही बसणार आहेत. बँकेचे व्यवहार थांबतील, नवीन खातं उघडणं तर सोडाच, पण जुन्या खात्याचं केवायसी (KYC) अडकलं तर व्यवहार करणं कठीण होईल. शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडात तुमचे पैसे असतील, तर पॅन कार्डशिवाय तुम्हाला ते काढता येणार नाहीत किंवा नवीन गुंतवणूक करता येणार नाही.

advertisement

पॅन नसेल तर बँका तुमच्या व्याजावर जास्त टॅक्स (TDS) कापतील. म्हणजेच, कष्टाची कमाई टॅक्समध्येच जास्त जाईल. होम लोन किंवा कार लोनसाठी पॅन कार्ड अनिवार्य असतं, तिथेही तुमची फाईल अडकू शकते. आजकाल सगळीकडे आधार कार्ड आणि पॅनकार्ड आवश्यक आहे. तुम्ही जर पॅनकार्ड व्यवस्थित अपडेट केलं नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.

advertisement

घाई करा, पण 'हे' लक्षात ठेवा!

हे लिंकिंग मोफत नाही. सध्या यासाठी १००० रुपये दंड (फी) भरावा लागणार आहे. ही फी भरल्याशिवाय तुमचं कार्ड लिंक होणार नाही. आयकर विभागाच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ही फी भरू शकता. बऱ्याचदा शेवटच्या दिवशी सर्व्हर डाऊन होण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे ३१ तारखेची वाट न पाहता आजच हे काम उरकून घेतलेलं बरं.

advertisement

कसं करायचं लिंक?

हे काम अगदी सोपं आहे, तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरूनही करू शकता

१. इनकम टॅक्सच्या वेबसाईटवर जा.

२. तिथे 'Link Aadhaar' या पर्यायावर क्लिक करा.

३. आपला पॅन आणि आधार नंबर टाकून माहिती तपासा.

४. नाव किंवा जन्मतारीख पॅन आणि आधारवर सारखीच असावी, याची खात्री करा. जर त्यात फरक असेल, तर आधी तो दुरुस्त करावा लागेल.

advertisement

नवीन वर्ष आनंदात साजरं करायचं असेल, तर त्याआधी या कायदेशीर कटकटीतून मुक्त व्हा. १ जानेवारीला बँक किंवा ऑफिसमध्ये गेल्यावर "पॅन कार्ड चालत नाहीये" असं ऐकण्यापेक्षा आजचे १० मिनिटं खर्च करणं कधीही फायद्याचं ठरेल!

मराठी बातम्या/मनी/
अवघे काही तास शिल्लक, ३१ डिसेंबरनंतर खिशातलं कार्ड ठरेल फक्त प्लास्टिकचा तुकडा; अन्यथा आजच करा हे काम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल