डेबिट कार्ड EMI फक्त 'आपले पैसे खर्च करणे' नाही
सामान्य डेबिट कार्ड स्वाइपमध्ये तुम्ही तुमच्या अकाउंटमधून पैसे देतात आणि प्रकरण येथेच संपते. यामध्ये कोणतेही लोन नसते आणि याची माहिती क्रेडिटब्यूरोला पाठवत नाही. पण ज्यावेळी तुम्ही एखाद्या खरेदीला डेबिट कार्ड ईएमआयमध्ये बदलता, तेव्हा बँक किंवा एनबीएफसी तुम्हाला एक छोटं लोन देत असते. मग ती रक्कम हप्त्यांमध्ये वसूल केली जाते. यामुळे हे एक लोन प्रकारे तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये नोंदवले जाते.
advertisement
तुमच्या क्रेडिट रिपोर्टमध्ये काय दिसते?
ज्यावेळी तुम्ही डेबिट कार्ड EMI घेता तेव्हा तुमच्या नावावर एक लहान पर्सनल किंवा ग्राहक कर्ज उघडले जाते. ते निश्चित कालावधी, EMI रक्कम आणि पेमेंट तारीख निर्दिष्ट करते. वेळेवर पेमेंट केल्याने एक चांगला रेकॉर्ड तयार होईल. उशिरा किंवा बाउन्सिंग हप्ते डिफॉल्ट मानले जातील. म्हणून, एक छोटीशी चूक देखील तुमचा स्कोअर कमी करू शकते.
10 लाखांचा फंड 5 वर्षात हवा आहे, पाहा आजपासून किती करावी मंथली SIP
EMI घेतल्याने स्कोअर खाली येतो का?
फक्त एक डेबिट कार्ड ईएमआय घेतल्याने तुमचा स्कोअर आपोआप खाली येत नाही. तुम्ही वेळेवर पैसे भरत राहिले तर तुमच्या क्रेडिट कार्ड हिस्ट्रीला मजबूतही करु शकते. विशेषतः ज्यावेळी तुमच्याजवळ पहिलेच जास्त लोन नसते. जेव्हा तुमचे एकाच वेळी अनेक ईएमआय चालू असतात, वारंवार अल्पकालीन कर्जे काढली जातात आणि पेमेंट करण्यास विलंब होतो तेव्हा समस्या उद्भवतात. अशा पद्धतींमुळे बँका भविष्यात तुम्हाला उच्च-जोखीम असलेले ग्राहक मानू शकतात.
लोक कुठे चूक करतात?
सर्वात मोठी चूक म्हणजे हे 'कर्ज' नाही असे वाटणे. पैसे ऑटो-डेबिट होत असल्याने, बरेच लोक त्यांची बॅलेन्स चेक करणं विसरतात. देय तारखेपर्यंत खात्यात पुरेशी बॅलेन्स नसेल तर ईएमआय बाउन्स होऊ शकतो.
Bank Loan : लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'या' 2 बँकांच्या ग्राहकांसाठी चांगली बातमी
EMI बाउंस झाल्यास काय?
- लेट फीस लागते.
- व्याज वाढू शकते.
- उशीर झाल्याची माहिती क्रेडिट रिपोर्टमध्ये नोंदवली जाते.
- या व्यतिरिक्त अनेक अॅप आणि वेबसाइट्सवर लहान-लहान ईएमआय घेणे सोपे आहे. मात्र कागदावर हे सर्व मिळून तुम्हाला ओव्हर-लोन घेतलेलं दाखवू शकतात.
डेबिट कार्ड ईएमायपासून दूर राहायला हवं?
आवश्यक नाही. तुमच्याजवळ क्रेडिट कार्ड नसेल किंवा तुम्हाला मोठं व्याज टाळायचं असेल तर डेबिट कार्ड ईएमआयचा ऑप्शन चांगला असतो. मात्र याला पेमेंट ट्रिक नाही तर लोन समजून वापरा. योग्य पद्धतीने वापर केल्यास हे तुमच्या क्रेडिट स्कोअरला नुकसान पोहोचवणार नाही. निष्काळजीपणा केल्यास परिणाम अवश्य दिसेल.
