TRENDING:

PNB मध्ये तुमचं अकाउंट आहे का? मग लगेच करा हे काम, अन्यथा बंद होईल अकाउंट

Last Updated:

Punjab National Bank Alert : पंजाब नॅशनल बँकेने सोशल मीडियाद्वारे आपल्या ग्राहकांना अलर्ट केलंय. एक महत्त्वाचं काम केलं नाही तर काही लोकांचं अकाउंट हे बंद केलं जाणार आहे.

advertisement
मुंबई : तुमचं अकाउंट पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी बँक) असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. खरंतर, PNB ने अशा ग्राहकांना किंवा खातेधारकांना पुन्हा अलर्ट जारी केला आहे ज्यांच्या अकाउंटमध्ये दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार झालेला नाही आणि या अकाउंटमध्ये झिरो बॅलेन्स आहे. बँकेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (आता एक्स) वर एका पोस्टद्वारे म्हटले आहे की हे अकाउंट बंद केले जातील. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या PNB अकाउंटमध्ये 3 वर्षांपासून कोणताही व्यवहार केला नसेल, तर हे काम लवकरात लवकर करा. बँकेने काय म्हटले आहे ते जाणून घेऊया?
पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँक
advertisement

सोशल मीडियाच्या माध्यमातून अलर्ट

PNBने आपल्या ट्विटरवर एक अलर्ट जारी केला आहे. यात म्हटलंय की, 'महत्त्वपूर्ण सूचना, तुम्ही दोन वर्षापासून अधिक काळापर्यंत कस्टमर अकाउंटमध्ये कोणतंही ट्रांझेक्शन झालेलं नसेल तर अकाउंट निष्क्रिय होईल. कृपया आपल्या अकाउंटमध्ये ट्रांझेक्शन करा. जेणकरुन अकाउंट निष्क्रिय होणार नाही.' यापूर्वी अनेकदा बँकेकडून आपल्या ग्राहकांना यासाठी अलर्ट करण्यात आले आहे. यावेळी बँकेकडून कोणतीही डेडलाइन सेट करण्यात आलेली नाही.

advertisement

Post Officeची भारी स्किम! फक्त व्याजातूनच कमावता येतील 2 लाख रुपये

अनेक वेळा ग्राहकांना इशारा देण्यात आला

पंजाब नॅशनल बँकेने असे पाहिलंय की, अनेक अकाउंटमध्ये गेल्या दोन-तीन वर्षांपासून ग्राहकांकडून कोणतेही व्यवहार झाले नाहीत आणि त्यामध्ये कोणतीही रक्कम शिल्लक नाही. अशा वेळी या खात्यांचा गैरवापर रोखण्यासाठी पाऊल म्हणून ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात, बँकेने ग्राहकांना अनेक इशारे दिले आहेत, परंतु असे असूनही, अजूनही अनेक अकाउंट आहेत ज्यात कोणतेही व्यवहार झाले नाहीत, ज्यामुळे बँकेने पुन्हा एकदा अलर्ट पाठवला आहे.

advertisement

गेल्या 1 मे 2024, 16 मे 2024, 24 मे 2024, 1 जून 2024 आणि 30 जून 2024 रोजी वेबसाइट आणि सोशल मीडियाद्वारे याची माहिती शेअर केली गेली आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी अशा सर्व ग्राहकांना त्यांचे अकाउंट लवकरात लवकर सक्रिय करावे लागेल.

Star Health Insurance चा विमा घेतलाय? मग ही महत्वाची बातमी तुमच्यासाठीच

advertisement

ही खाती बंद केली जाणार नाहीत

पंजाब नॅशनल बँकेने यापूर्वीच अशे सर्व अकाउंट कोणतीही सूचना न देता बंद केली जातील, असे स्पष्ट केले होते. मात्र, डीमॅट खात्यांशी जोडलेले असे अकाउंट बंद केले जाणार नाहीत. त्याच वेळी, 25 वर्षांपेक्षा कमी वयाच्या ग्राहकांसह विद्यार्थ्यांचे अकाउंट, अल्पवयीन मुलांची अकाउंट, SSY/PMJJBY/PMSBY/APY सारख्या योजनांसाठी उघडलेले अकाउंट देखील निलंबित केले जाणार नाहीत.

advertisement

अकाउंट सक्रिय करण्यासाठी हे काम आवश्यक आहे

इशारा देत बँकेने ही सुविधा देखील ग्राहकांना दिली आहे की त्यांना त्यांच्या खात्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास किंवा कोणतीही मदत घ्यायची असल्यास ते थेट त्यांच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधू शकतात. पीएनबीच्या मते, खातेधारकाने त्याच्या खात्याच्या केवायसीशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे संबंधित शाखेत सबमिट केल्याशिवाय अशी खाती पुन्हा अॅक्टिव्ह केली जाऊ शकत नाहीत. म्हणजेच, तुम्हाला तुमचे अकाउंट सक्रिय ठेवायचे असेल तर बँकेच्या शाखेत जा आणि लगेच KYC करा.

मराठी बातम्या/मनी/
PNB मध्ये तुमचं अकाउंट आहे का? मग लगेच करा हे काम, अन्यथा बंद होईल अकाउंट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल