Post Officeची भारी स्किम! फक्त व्याजातूनच कमावता येतील 2 लाख रुपये

Last Updated:

पोस्ट ऑफिसच्या या स्किममध्ये गुंतवणुकीवर सरकारकडून 7.5 टक्के इतके आकर्षक व्याज दिले जात आहे आणि गुंतवणूकदाराला त्यात 5 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल.

पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट
मुंबई : प्रत्येकजण आपल्या कमाईचा काही भाग बजेट करतो आणि तो अशा ठिकाणी गुंतवू इच्छितो जिथे त्यांचे पैसे सुरक्षित असतील आणि त्यांना उत्कृष्ट रिटर्न मिळेल. या संदर्भात, पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक योजना खूप लोकप्रिय होताय. यामध्ये कमी प्रमाणात गुंतवणूक करूनही तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. अशीच एक बजेट स्किम म्हणजे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्किम आहे. ज्यामध्ये सरकारकडून व्याज देखील दिले जात आहे.
या स्किममध्ये 7.5% शानदार व्याज
पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयोगटासाठी मग ते लहान मुले, वृद्ध, तरुण आणि महिलांसाठी सेव्हिंग स्किम चालवल्या जातात. आपण पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमबद्दल बोललो, तर जोरदार रिटर्न, सुरक्षित गुंतवणुकीसह, एखाद्याला टॅक्स सूटचा लाभ देखील मिळतो, ज्यामुळे ती खूप लोकप्रिय आहे. या योजनेत पाच वर्षांसाठी पैसे गुंतवले जातात. या कालावधीतील गुंतवणुकीसाठी सरकारकडून 7.5 टक्के आकर्षक व्याज दिले जात आहे. म्हणजे रिटर्न देण्याच्या बाबतीतही ही स्किम पुढे आहे.
advertisement
वेगवेगळ्या कार्यकाळांवर इतके व्याज
तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम अंतर्गत वेगवेगळ्या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. यामध्ये 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी पैसे जमा करता येतात. तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळेल, तर 2 किंवा 3 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास दर 7 टक्के दर निश्चित करण्यात आला आहे. तुम्ही या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 7.5 टक्के दराने व्याज मिळते.
advertisement
व्याजातून लाख कसे कमवायचे?
तुम्ही पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिटमधील व्याजातून होणाऱ्या कमाईचं कॅलक्युलेशन केल तर, एखाद्या गुंतवणूकदाराने या पोस्ट ऑफिस योजनेमध्ये पाच वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवले असतील, तर 7.5 टक्के दराने, त्याला या कालावधीत ठेवीवर 2% व्याज मिळेल. तुम्हाला 24,974 रुपये व्याज मिळेल. त्याच वेळी, मॅच्युरिटीवर एकूण रक्कम 7,24,974 रुपये होईल. याचा अर्थ असा की तुम्हाला केवळ व्याजातून 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई होईल.
advertisement
Tax सूटचाही लाभ मिळतो
टाईम डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकाला आयकर विभाग कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील दिला जातो. या बचत योजनेत सिंगल अकाउंट किंवा जॉइंट अकाउंट खाते उघडता येते. 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाचे खाते त्याच्या कुटुंबातील सदस्याद्वारे उघडता येते. यामध्ये किमान 1,000 रुपयांमध्ये खाते उघडता येते. ज्यामध्ये व्याजाचे पैसे वार्षिक आधारावर जोडले जातात. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही, म्हणजेच तुम्ही जितके जास्त पैसे गुंतवलेत, त्यानुसार तुमचे व्याज उत्पन्नही वाढेल.
मराठी बातम्या/मनी/
Post Officeची भारी स्किम! फक्त व्याजातूनच कमावता येतील 2 लाख रुपये
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement