advertisement

Krushi Market: मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? VIdeo

Last Updated:

राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

+
News18

News18

मुंबई: शुक्रवार, दिनांक 24 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये सोयाबीन, मका आणि कांद्याची आवक आणि भाव पाहू.
मक्याच्या दरात सुधारणा
राज्याच्या कृषीमार्केटमध्ये आज एकूण 16 हजार 017 क्विंटल मक्याची एकूण आवक झाली. यापैकी जळगाव मार्केटमध्ये 6 हजार 323 क्विंटल लाल मक्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 1375 ते जास्तीत जास्त 1700 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 216 क्विंटल मक्यास प्रतीनुसार 2800 ते 3500 रुपये सर्वाधिक भाव मिळाला.
advertisement
पांढर्‍या कांद्यास चांगला दर
राज्याच्या मार्केटमध्ये 38 हजार 104 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी 9 हजार 246 क्विंटल सर्वाधिक आवक उंचावणे बाजारात झाली. त्यास प्रतीनुसार कमीत कमी 547 ते जास्तीत जास्त 1525 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला. तसेच सोलापूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 601 क्विंटल पांढर्‍या कांद्यास प्रतीनुसार कमीत कमी 200 ते जास्तीत जास्त 3500 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळाला.
advertisement
सोयाबीन आवकेत मोठी घट
राज्याच्या मार्केटमध्ये 5 हजार 218 क्विंटल सोयाबीनची एकूण आवक झाली. यापैकी यवतमाळ मार्केटमध्ये सर्वाधिक 2 हजार 062 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3166 ते 4088 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच नांदेड मार्केटमध्ये 110 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास प्रतीनुसार 3150 ते 4375 रुपये सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Krushi Market: मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीनला आज काय मिळाला भाव? VIdeo
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement