Sukanya Samriddhi vs NPS Vatsalya : एनपीएस वात्सल्य की सुकन्या समृद्धी, कोणत्या योजनेत मिळतात जास्त पैसे? मुलांच्या भविष्यासाठी कोणती चांगली?

Last Updated:

लहान मुलांच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी सरकारी योजनांमध्ये आणखी एका पर्यायाची भर पडली आहे. या योजनांची तुलनात्मक माहिती घेऊया.

News18
News18
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच एनपीएस वात्सल्य ही योजना सादर केली. त्यामुळे लहान मुलांच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी असलेल्या पर्यायांमध्ये आणखी एका पर्यायाची भर पडली आहे. सुकन्या समृद्धी योजना, तसंच, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ या योजनादेखील अल्पवयीन मुलांच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध आहेत.
लहान मुलांच्या नावे गुंतवणूक करण्यासाठी सरकारी योजनांमध्ये आणखी एका पर्यायाची भर पडली आहे. या योजनांची तुलनात्मक माहिती घेऊ या.
या योजनांची तुलनात्मक माहिती घेऊ या, जेणेकरून कोणती योजना निवडायची, याचा निर्णय घेणं सोपं जाऊ शकेल.
एनपीएस वात्सल्य योजना काय आहे?
एनपीएस वात्सल्य योजना नुकतीच सादर झाली असून, 18 वर्षं वयापर्यंतच्या मुलांच्या नावे यात गुंतवणूक करता येते. या योजनेत अकाउंट उघडण्यासाठी किमान एक हजार रुपये भरणं आवश्यक आहे. तसंच, त्यापुढे प्रत्येक आर्थिक वर्षात किमान एक हजार रुपये या खात्यात भरले जाणं आवश्यक आहे. वार्षिक किती पैसे या खात्यात भरावेत, याची कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही.
advertisement
या योजनेला तीन वर्षांचा लॉक-इन पीरियड असून, त्या कालावधीत पैसे काढता येत नाहीत. त्यानंतर शिक्षण किंवा आजारपणाच्या कारणासाठी 25 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते.
ज्या अल्पवयीन मुलाच्या नावावर हे खातं आहे, ते अल्पवयीन मूल 18 वर्षांचं झाल्यावर तोपर्यंत जमा झालेल्या निधीचा काही भाग काढू शकतात किंवा अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरू शकतात.
advertisement
पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने (पीएफआरडीए) असं स्पष्ट केलं आहे, की एनपीएसमध्ये 13 लाख कोटी रुपयांचा निधी जमा झाला असून, इक्विटी फंड्स 14.2 टक्के कम्पाउंडिंग अॅन्युअल ग्रोथ रेट दर्शवत आहेत.
एनपीएस वात्सल्य ही योजना अल्पवयीन मुलांना चक्रवाढ दराचा लाभ देऊ इच्छिते. कामकाजात सुधारणा करण्यासाठी पीएफआरडीए प्रयत्नशील असून, सुधारणेसाठीच्या सूचनांचाही विचार करत आहे.
advertisement
सुकन्या समृद्धी योजना काय आहे?
सुकन्या समृद्धी योजना ही खासकरून मुलींसाठीच तयार करण्यात आलेली योजना आहे. 10 वर्षं वयापर्यंतच्या मुलींच्या नावे या योजनेअंतर्गत खातं उघडता येतं. या योजनेमध्ये खातं उघडल्यास वार्षिक कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवणूक करता येते. सुकन्या समृद्धी योजनेतला व्याजदर सध्या 8.2 टक्के असून, त्यात दर तीन महिन्यांनी बदल होतो/होऊ शकतो. व्याजदर चांगला असल्याने त्याचा चांगला परतावा मिळतो.
advertisement
मुलगी 18 वर्षं वयाची झाल्यानंतर या खात्यातून तिच्या उच्च शिक्षणासाठी काही रक्कम काढता येते. तसंच मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर खात्यातली सर्व रक्कम काढता येते.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही सर्व भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध असलेली दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. त्यात लहान मुलं, तसंच प्रौढांचंही खातं काढता येतं.
advertisement
या खात्यात प्रति वर्षी किमान 500 रुपये भरावे लागतात आणि कमाल दीड लाख रुपये भरता येतात. पीपीएफचा व्याजदर 7.1 टक्क्यांच्या आसपास असतो आणि तो निश्चित आणि स्थिर असतो.
खात्याला सात वर्षं झाल्यानंतर त्यातली काही रक्कम काढता येऊ शकते. तसंच, खात्याला 15 वर्षं झाल्यानंतर सर्व रक्कम काढता येऊ शकते. त्यानंतर दर पाच वर्षांसाठी त्या खात्याला मुदतवाढ घेता येऊ शकते. स्थिरता आणि करसवलतीच्या लाभासाठी पीपीएफ ही योजना ओळखली जाते.
advertisement
कोणती योजना चांगली?
पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना आणि एनपीएस वात्सल्य योजना यांपैकी कोणती योजना निवडावी हे ज्याची त्याची आर्थिक उद्दिष्टं आणि गुंतवणुकीच्या प्राधान्यक्रमांवर अवलंबून आहे.
लवचिकता आणि संभाव्य मोठी वृद्धी अपेक्षित असलेल्यांसाठी एनपीएस वात्सल्य योजना चांगली आहे. मुलींसाठी मोठ्या व्याजदराची गुंतवणूक करायची असलेल्यांकरिता सुकन्या समृद्धी योजना चांगली आहे. पीपीएफ ही योजना म्हणजे विश्वासार्ह आणि स्थिर गुंतवणूक पर्याय आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Sukanya Samriddhi vs NPS Vatsalya : एनपीएस वात्सल्य की सुकन्या समृद्धी, कोणत्या योजनेत मिळतात जास्त पैसे? मुलांच्या भविष्यासाठी कोणती चांगली?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement