Savings Accountचे हे 2 मोठे नियम अनेकांना माहितीच नाही, जाणून घेतल्यास होईल फायदा
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
बचत खात्याशी संबंधित काही नियम आहेत. ज्यांची काळजी न घेतल्यास खातेधारकाचे गंभीर नुकसान होऊ शकते. मात्र, हे नियम फार कमी लोकांना माहीत आहेत.
नवी दिल्ली : तुमचा पगार एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कर भरावा लागेल. आयकर विभाग कर न भरल्यामुळे तुमच्यावर कारवाई करू शकतो. परंतु केवळ तुमची कमाई आयकर विभागाच्या देखरेखीखाली नाही तर तुमचे व्यवहारही त्याच्या निगराणीखाली आहेत. तुम्ही तुमच्या बचत खात्यातून दररोज आणि दरवर्षी किती पैसे जमा करत आहात यावरही आयकर विभाग लक्ष ठेवतो.
आरबीआयने जमा रकमेवर लिमिट लावली आहे. तुम्ही कोणाच्याही देखरेखीशिवाय एका वर्षाच्या आत तुमच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये 10 लाख रुपये जमा करू शकता. पण ही रक्कम ओलांडताच बँक लगेच आयकर विभागाला कळवते. तुम्हाला विभागाकडून नोटीस मिळू शकते. यावर तुम्हाला कर भरावा लागेलच असे नाही तर तुम्हाला या पैशाचा सोर्स देखील विचारला जाईल.
advertisement
सोर्स सांगू शकले नाही तर काय?
एखादा खातेदार त्याच्याकडे पैसा कोठून आला हे सांगू शकत नसेल, तर आयकर विभाग त्या रकमेवर 60 टक्के टॅक्स, 25 टक्के सरचार्ज आणि 4 टक्के सेस लावून खातेधारकाकडून रक्कम वसूल करू शकतो. आयकर विभागाने केवळ एका वर्षासाठीच नव्हे तर एक दिवसाच्या व्यवहारांसाठीही मर्यादा निश्चित केली आहे. तुम्ही एका दिवसात 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार करू शकत नाही. रोख व्यवहार म्हणजे केवळ अकाउंटमधून पैसे काढणे नव्हे. यामध्ये रोख रक्कम काढणे, अकाउंटमधून अकाउंटमध्ये ट्रान्सफर करणे किंवा एखाद्याला पैसे देणे याचा समावेश आहे. त्यामुळे कोणत्याही बँकेची एक दिवसाची रोख व्यवहार लिमिट 2 लाख रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे.
advertisement
रोख ठेवीशी संबंधित नियम थोडक्यात
-50,000 रुपये बँकेत जमा केल्यास पॅन कार्डची गरज नाही.
-तुम्ही 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास तुम्हाला पॅन कार्ड द्यावे लागेल.
-तुमच्या बचत खात्यात एका दिवसात 2 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जमा केल्यास, आयकर कायद्याच्या कलम 269ST अंतर्गत 100 टक्के दंड आकारला जाऊ शकतो.
advertisement
-तुम्ही एका वर्षात तुमच्या बचत खात्यात जास्तीत जास्त 10 लाख रुपये जमा करू शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 19, 2024 9:58 AM IST


