फक्त हे एक काम करून करोडपती होत आहेत भारतातील लोक; कमावतायेत 10 कोटी

Last Updated:

गेल्या पाच वर्षांत देशात 10 कोटी रुपयांहून जास्त कमाई करणाऱ्यांची संख्या 63 टक्क्यांनी वाढली आहे. दर वर्षी त्यात चार हजार व्यक्तींची भर पडत आहे. 

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
नवी दिल्ली : भारतात आता करोडपती नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या पाच वर्षांत देशात 10 कोटी रुपयांहून जास्त कमाई करणाऱ्यांची संख्या 63 टक्क्यांनी वाढली आहे. सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चने आपल्या ताज्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या काळात वार्षिक 10 कोटी रुपयांहून जास्त कमाई करणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत 20,034 ने वाढ झाली आहे. ज्यांचं उत्पन्न 10 कोटी रुपये किंवा त्याहून जास्त आहे याचा अर्थ दर वर्षी त्यात चार हजार व्यक्तींची भर पडत आहे. सध्या देशात एवढी कमाई करणाऱ्यांची एकूण संख्या 31,800 झाली आहे.
सेंट्रम इन्स्टिट्यूशनल रिसर्चनुसार, देशात पाच कोटींहून जास्त कमाई करणाऱ्यांची संख्या पाच वर्षांत दीड पटीने वाढली आहे. सध्या एवढी कमाई असलेल्या नागरिकांची संख्या 58,200 आहे. रिपोर्टनुसार, 2019 ते 2024 या आर्थिक वर्षांमध्ये देशातल्या नागरिकांच्या उत्पन्नात वेगाने वाढ झाली आहे. या काळात कोरोनामुळे भारतासह जगभरात खूप नुकसान झालं होतं. तरीही नागरिकांच्या उत्पन्नात वाढ झाली, हे महत्त्वाचं आहे.
advertisement
50 लाखांपेक्षा जास्त कमावणारे दीडपट
वार्षिक 50 लाख रुपयांहून जास्त कमाई करणाऱ्यांची संख्याही 49 टक्क्यांनी वाढली आहे. मागच्या पाच वर्षांत ती 49 लाख कोटींवर पोहोचली आहे. या काळात 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची एकूण संपत्ती वार्षिक 121 टक्क्यांनी वाढून 38 लाख कोटी रुपये झाली आहे. तसंच पाच कोटींहून जास्त कमाई करणाऱ्यांची एकूण संपत्ती 2019 ते 2024 या काळात 106 टक्क्यांनी वाढून 40 लाख कोटी रुपये झाली आहे.
advertisement
50 लाख कमावणाऱ्यांची संख्या
वार्षिक 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त कमावणाऱ्यांची संख्या मागच्या पाच वर्षांत 25 टक्के वाढून 10 लाख झाली आहे. देशात 10 कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ मोठी आहे. या नागरिकांचं एकूण उत्पन्न 121 टक्क्यांनी वाढून 38 लाख कोटी रुपये झालं आहे.
कुठून होत आहे इतकी कमाई?
देशातल्या हाय नेटवर्थ असलेल्या नागरिकांचं उत्पन्न 2028 पर्यंत वार्षिक जवळपास 14 टक्के दराने वाढण्याचा अंदाज आहे. ती 2.2 ट्रिलियन डॉलरपर्यंत जाऊ शकते. वाढत्या उत्पन्नाचा सर्वांत मोठा स्रोत म्हणजे लोक नोकऱ्यांऐवजी व्यवसायांकडे वळत आहेत. देशात फक्त 15 टक्के नागरिक संपत्ती प्रोफेशनच्या माध्यमातून मॅनेज करतात. जागतिक पातळीवर हा आकडा 75 टक्के आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
फक्त हे एक काम करून करोडपती होत आहेत भारतातील लोक; कमावतायेत 10 कोटी
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement